पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/४००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व " (३८५) ही रयतेस कर्ज काढण्याची संवय होतीच, ती इंग्रज सरकारांना लाव- ली असें नाही. हल्लींचे कारकीर्दीत जमिनीची किंमत व रयतेची पत ही दोन्ही वाढली आहेत. पूर्वी जमिनीवर मालकी फार थोडे कुळांस असे व ती फरोक्त करून देण्यास पुष्कळ अडचणी असत ; आतां रयतेस जमिनीवरील हक्क दुसऱ्यास फरोक्त करून देतां येतो व तो त्याचे पश्चात् वारसास जातो पूर्वी पिकाची व्यवस्था ठिकाणचे ठिकाणीच करावी लागे, आतां तें वाटेल तिकड़े पाठवून खपवितां येते, यामुळे शेतकीचे मालाची किंमत वाढली आहे. या सर्व कारणांमुळे जमिनीची किंमत वाढली आहे, व तिचेवर सावकार ही पूर्वी- पेक्षा जास्त ऐवज देतात. जमिनीची किंमत रयतेची पत ही वाढल्याने कर्ज काढण्याची पूर्वीची संवय मात्र गेली नाही, उलटी जमिनीवरील स्वत्व बळकट होत गेले तसतसे कर्ज काढण्याची वहिवाट ही वाढत गेली आहे. जमिनीचे मालकांची ही स्थिति झाली; कुळांची पत काय ती पिकावरच असते, व ती मात्र बरेच वेळां अगदी नादार असतात व त्यांचे सर्व श्रम सावकाराचे भरीस जातात. जमिनीवरील स्वत्व व तिची किंमत व तिचे मालकाची पत ही वाढल्याने आजपर्यंत शेतकरी वर्गाचा फायदा झाला आहे ; त्याप्रमाणे सावकरांचाही त्यांचेव- रील पगडा बळकट झाला आहे. पूर्वीचे कारकर्दीित देण्याचे फेडीबद्दल सावकारांस जमीन मिळत नसे. कारण तिचेवरील कुळांचा हक्कसंबंध फारच मर्यादित असे. आतां जमिनीवरील स्वत्व कायम झाल्यामुळे दिवाणी हुकुमनामे व दस्तऐवज यांचे द्वारे ती सावकारांचे घरांत जाण्यास सोय झाली आहे. पंजाब, मध्य- प्रांत, दक्षिणप्रांत व झांशी जिल्हा ह्यांत कुळांकडून सावकारांचे ताब्यांत जमिनी गेल्याने राज्यकर्त्यांस काही वेळां फार अडचणी आल्या होत्या. साव- कारांचा पगडा व जमीन मालकांकडून जाणे या गोष्टी फार वाढत गेल्या तर स्थिति वाईट होईल. जमिनी, उत्साहयुक्त व सुशिक्षित जमिनी कसणारे लोकां- कडे गेल्या तर स्थिति वाईट होईल असें ह्मणतां येत नाही, परंतु ज्या प्रांतांत पुष्कळ जमिनी एका मालकाकडे आहेत असे लोकांची स्थिति पाहिली ह्मणजे श्रीमंत लोकांकडे जमिनी गेल्यापासून फायदा झाला असे दृष्टोत्पत्तीस येत नाही कारण एक तर ते जमिनदार इष्टेटी सोडून बाहेर राहून जमिनींचे उत्पन्न इतरच खर्च करतात, किंवा जमिनीवर राहून उधळेपणाने कर्ज काढून इष्टेटीवर कर्जा- चा बोजा वाढवितात. पहिल्या प्रकारचे उदाहरण बंगाल्यांतील व मद्रासेंतील जमिनदार आहेत व दुसरे प्रकारचे उदाहरण अयोध्या व गुजराथ प्रांतांतील तालुकदार आहेत ; या तालुकदारांची स्थिति इतकी वाईट झाली की, त्यांचे २५