पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३८४) मुळे व दक्षिणेत व पश्चिम किनाऱ्याचे काही भागांत पर्जन्याचे मान अनिश्चित असल्यामुळे लोकांची स्थिति वर सांगितल्याप्रमाणे चांगली असत नाही. सर्वांत विहार प्रांत व समुद्र किनाऱ्यावरचे प्रदेशांत लोकांची स्थिति जास्त वाईट आहे. इतर भागांत एखादे साली पीक वाईट आले तरी लोकांस अडचण न पडतां निभाव करून घेता येतो. अतिशय दाट वस्ती असलेल्या भागांत काही लोकांचा गुजारा काही महिने कष्टाने होतो. जंगली लोक दोन पिकांचे दर- म्यान जो काळ जातो त्यांत जंगलांतील उत्पन्नावर उदरनिर्वाह नेहमीच करतात. चिकपणा व दिवाणी दावे-येथपर्यंत विचार करते वेळी खर्चाच्या दोन वाबी ह्मणजे दिवाणी दावे व विवाह वगैरे समारंभ ह्यांचे संबंधाने उल्लेख केला नाही. जमिनीची वहिवाट जेथे समुच्चयाने करण्यांत येते किंवा मालकां- कडून कुळेच जेथे तिची लागण करितात असे भागांत दिवाणी दाव्यांची वाढ जास्त दृष्टीस पडते ; इतर प्रांतांत तितकी दृष्ठसि पडत नाही. विवाह वगैरे समारंभाचे वेळी जास्त खर्च करण्याची वहिवाट सर्वत्र आहे. त्या खर्चापासून विवाह झालेले जोडप्याचा काही फायदा होतो असें नाहीं, आपलें ऐश्वर्य लोकांत मिरविण्यास सांपडावे हाच त्या खर्चाचा हेतु असतो. हा खर्च शेतकऱ्यांचे निकृष्ठावस्थेची जी कारणे आहेत त्यांपैकी मुख्य कारण आहे. कर्जबाजारीपणा.-या देशांतील शेतकरी ह्मणजे सर्व कर्जबाजारी आहेत असें नाही. पर्जन्याची शाश्वती नाही असे भागांत एखादे वाईट साली पुढील पिकावर देण्याचे वोलीने कर्ज काढण्यास सुरवात होते ; पुढील पीक चांगलें आले तर बरें, त्यास धोका बसला की देण्याचे ओझें बसलेंच. असे भागांत तसे साली सारा घेण्याचें तहकूब केल्याने शेतक-यांस सरकार देण्यासाठी कर्ज काढावे लागत नाही. जमीन बाबीचे बोजामुळे लोक कर्जबाजारी होतात हे संभवनीय वाटत नाही. ज्या भागांत पाऊस पडण्याचे आनिश्चित असते असे भागांत सरकारचे देणें भारी पडतें असें मटले तर काही तरी शोभेल, परंतु इतर सुपीक भागांत साऱ्याचा बोजा भारी आहे किवा त्यामुळे रयतेस कर्ज काढावे लागतें असें ह्मणतां येणार नाही. कर्जबाजारीपणा हा पर्जन्य कमी असलेले भागांतच आहे व ज्या भागांतील जमीन फार सुपीक आहे असे भागांत त्यापासून रयत सुटली आहे असें नाहीं. साधारणपणे कमी जास्ती प्रमाणाने शेतकरी वर्गात कर्जबाजारीपणा सर्वत्र आहे. रयत नादार झाली आहे किंवा अगदी लाचार झाली आहे असा मात्र याचा अर्थ घ्यावयाचा नाहा ; एखादे दुकानांत चालू खाते ठेवावें व त्यांत खातेदाराकडे जास्त वाकी रहावी यासारखें हे आहे. इंग्रजी राज्य सुरू होण्यापूर्वी