पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शह-

( ३८३) समजणे कठीण असते. घरे ही कांही संपत्तीची द्योतक असत नाहीत. रांबाहेरील लोकांचा बहुतेक व्यापार बाहेरच उघड्यावर होत असल्यामुळे व चांगली घरे बांधण्यास साधनें विपूल नसल्यामुळे घरे बांधण्याचे कामांत पैसा कमी खर्ची पडतो ; व शहरांतील घरे शिवाय करून इतर घरें जवळचे जवळ मिळत असतील तसे मालमसाल्यानेच बांधण्यात येतात. साधारणतः जमीन करणारे शेतकरी लोकांत बायकांचे संबंधाने गोष्याची वहिवाट असल्याशिवाय नोकर लोक ठेवण्याची वहिवाट कमी, काय जे नौकर ठेवतील ते शेतकीचे कामासाठीच ; तेव्हां घर कामासाठी नौकर ठेवण्याची वहिवाट दिसल्यास त्याव- हन संपत्ति वाढली आहे असें अनुमान करण्यास हरकत नाही. शेतकरी वर्गाची सांपत्तिक स्थिति सुधारली तरी त्यांचे खाण्यापिण्यांत विशेषसें अंतर पडत नाही. दुभते जनावरांची संख्या वाढली आहे, तेव्हां दूध दूभते जास्त खाण्यांत येत असले पाहिजे. जोंधळे किंवा बाजरीच खाण्याचा प्रघात आहे, असे भागांत आतां तांदूळ पुष्कळ खाण्यांत येऊ लागला आहे. तूप, साखर, मसाला, वगैरे जिन्नसही आतां जास्त खपतात; अगदी गरीव लोक सोडून देऊन वाकीचे लोकांचे घरी आतां तवि पितळेची भांडी पुष्कळ दृष्टीस पडतात. कापसाची व लोंकरीची वस्त्रे परदेशांतून पुष्कळ येतात, व फलाणीसारखे उंची कापड खेड्या पाड्याचे दुकानांत ही आतां दृष्टीस पडते. तसेंच परदेशांतून आलेल्या चैनीच्या वस्तूंचाही प्रसार लोकांत फार झाला आहे. पूर्वीपेक्षां आतां सोन्या रुप्याचे दागिने पुष्कळ दृष्टीस पडतात. लोकांत जास्त खर्च करण्याचे सामर्थ्य वाढले आहे याचे प्रत्यक्ष उदाहरण, आगगाड्यांतून तिसरे वर्गाचे उतारूंची संख्या वाढते प्रमाणावर आहे हे होय. प्राप्ती-आतां दर माणशी साधारण प्राप्ती किती होते हे पाहूं. या संबं- धाने प्रारंभीच असे सांगितले पाहिजे की याबद्दल प्रत्यक्ष माहिती मिळत नाहीं; प्राप्तीबद्दल सभोवतालचे गोष्टवरूनच अनुमाने काढावी लागतात. साधा- रण विचार करतां लोकसंख्या व जनावरे यांची वाढ होत आहे, लागवडी जमीन व पीक ही वाढत आहेत, परदेशाचे मागण्यामुळे नवीन व किफायतीची पिके जास्त काढण्यात येत आहेत. पूर्वी ज्या वस्तू चैनीखातर वापरण्यात येत असत त्या हली अवश्यक वस्तू झाल्या आहेत. या सर्व गोष्टींवरून शेतकरी लोकांस पुरेशी प्राप्ती आहे व त्यांची स्थिती उत्तरोत्तर सुधारत आहे असे अनु- मान करण्यास हरकत नाही. हा एकंदरींचा विचार झाला. विशेष भागाचे संबंधाने विचार पाहतां पाटना व लखनौ यांचे दरम्यानचे भागांत व यमुना नदीचे खोऱ्याचे दक्षिण व पश्चिम भागांत जमिनीचे मानाने लोकसंख्या फार असल्या-