पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३८२) परकीय मालाच्या किमती-परकीय माल या देशांत येतो त्यांतही वाढ झाली आहे. गेले १२ वर्षांत माल आणण्यास लागणारे भाडे व माल तयार करण्यास मजुरी कमी लागू लागल्याने हा माल आतां स्वस्त झाला आहे. पूर्वी जे काही जिन्नस चैनीचे ह्मणून मानले जात असत ते आतां अवश्य वाटू लागले आहेत. पूर्वीच्या देशी छत्र्याचे बदलीं विलायती छत्र्या, तेल्याचे तेलाचे बदली खाणींतील तेल, मातीचे भांड्यांचेबद्दल धातूची भांडी, ऊस गाळण्यास लांकडी चरकाबद्दल लोखंडी चरक, असे फरक झाले आहेत. विलायती कापडाचा खप फार वाढला आहे व सूतही विणण्यासाठी पुष्कळ खपते. शिवण्याची यंत्रे तर गांवोगांव झाली आहेत. चाकू, कात्र्या, गलासें वगैरे तन्हेचे सामानाची दुकानेंही पुष्कळ वाढली आहेत. हे सर्व प्रकार चांगली राहण्याची तन्हा जास्त आवडू लागल्याने, किंवा त्यांपासून पैशांचा फायदा होत असल्याने झाले असावेत; नाही तर ह्या नवीन गोष्टी शेतकरी वर्गासारखे परंपरागत गोष्टीस अनुसरणारे लोकांत शिरल्या नसत्या. जमिनीच्या किमती-पिकाची किंमत वाढली आहे त्याचप्रमाणे जमिनीची किंमतही वाढली आहे. जमिनीची किंमत ती धारण करण्याच्या ज्या पद्धता चालू असतील त्यांचेवर पुष्कळ अंशी अवलंबून असते. जमिनीचे मालकांस जमिनीवल जे भाडे मिळतें तें ही पुष्कळ वाढले आहे. जमिनीची योग्यता व सरकार देण्याचा माफकपणा ह्यांची परीक्षा सारा नियमितपणाने देण्यांत येतो यावरून ही होते. साऱ्यासाठी जमिनीचे फार क्वचित् लिलाव होतात. जमिनीची किंमत वाढल्याने तिजवरील आपले हक्क स्थापित करून घेण्याकडे ही मालकांचा कल वाढत चालला आहे. पूर्वी परशत्रूपासून संरक्षण होण्यासाठी आपले जवळच लोकांशी मिळून राहणे त्यांस जसें अवश्य वाटत होते तसें आतां देशांत पूर्ण स्वस्थता झाल्यामुळे वाटत नाही ; स्वतंत्र मालकी असावी ही इच्छा जशी बलवान होत जाते त्याच मानाने पूर्वीची गांवकीची व्यवस्था ही ढासळत जाते. पूर्वी जमीन धारण करण्याचे पद्धतीसंबंधाने सांगते वेळी या नूतन मनो- वृत्तीचा उल्लेख केलाच आहे. जमिनी वांटून घेण्याची वहिवाट फार प्रचारांत आली ह्मणजे कुळांस अगदी थोडी जमीन पडते व तिचेपासून गुजारा होत नाहीसा होतो ; व भिकेची पाळी येते किंवा शेतकीचे जोडीस मजूरीचा धंदा पत- करावा लागतो. राहण्याची तन्हा-आतां लोकांची राहण्याची रीति सुधारली आहे. किंवा नाही यासंबंघाने पाहूं. यासंबंधाने विचार करण्याचेही फार कठीण आहे, कारण ज्या गोष्टींवरून अनुमाने काढण्याची, त्यांचा खरा भाव %3B