पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३८१) एकरास पीक किती येते याबद्दल खालीलायक प्रमाण अजून ठरलेले नाही हे लक्ष्यांत ठेवले पाहिजे. एकंदर सगळे देशाचा विचार केला तर उत्पन्न होत असलेले धान्य लोकांचे उदरनिर्वाहास अपुरे आहे असें नाहीं; त्याची सर्व भागांत सारखी वाटणी झा- लेली नसते ह्यामुळेच अडचणी उत्पन्न होतात. पूर्वी देशांत दळणवळणाचे मार्ग चांगले नव्हते यामुळे एकीकडे सुबत्ता तर दुसरीकडे दुर्भिक्ष अशी स्थिति एका वेळीच होत असे, व त्याचा प्रतीकार करणे ही शक्य नसे. आतां रस्ते, आगगाड्या वगैरे सोई झाल्याने पर्जन्य कमी पडतो असे प्रदेश, पर्जन्य चांगला पडतो असे प्रदेश यांच्यामध्ये दळण वळण चांगले राहते व सर्व देशभर धान्या- च्या किमती साधारण सारख्या राहतात. सर्व देशभर पर्जन्याचे अवर्षण एका काली होत नाही, सुमारे दोन तृतीयांश भागांत सारखी स्थिति असते असा अनुभव आहे. आतां एखादे साली एखादे भागांत अवर्षण पडले तर दुसरे भागांतून माल येउन अन्नाची अडचण तेव्हांच दूर होते. रस्ते व शेतकीच्या मालाच्या किमती.- रस्ते वाढल्याने मालाची अदलाबदल पुष्कळ होऊ लागली आहे. सन १८८०-८१ चे मानाने सन १८९१-९२ साली आगगाडीचे रस्त्यांत ८६ टक्के वाढ झाली आहे ; त्या मार्गाने दुप्पट माल जाऊं येऊ लागला आहे, व लोकांचे जाणे येणे जवळ जवळ अडीच पटीने वाढले आहे. आगगाडीचे व दुसरे रस्ते वाढल्याने, पूर्वी जशी एका भागांत धान्यास किंमत फार कमी व एका भागांत फार जास्ती असे, तसें आतां होणार नाही. आतां सर्व देशांत किमती सारख्या होत चालल्या आहेत व त्या एकंदरीत वाढत आहेत. वायव्य प्रांतांत सन १८६१-६५ सालचे मानाने किमती दिढीवर वाढल्या आहेत. मध्यप्रांतांत सन १८५८-६३ चे मानाने तांदुळाची किंमत तिप्पट झाली आहे. ब्रह्मदेशांत तांदूळ १८८१-८२ पासून दुप्पट महाग झाले आहेत ; आसामांत त्याची किंमत ४० टक्के व बंगाल्यांत ४-२० टक्यापर्यंत वाढली आहे. व-हाडांत धान्याची किंमत दहा सालांतच पावणेदोनपट झाली आहे. मुंबई इलाख्यांतील वेगळाले प्रांतांत किमतीत फारच अंतर असते व तशीच स्थिति बंगाल्यांतही असते. एकंदर या प्रांतांत किमती वाढल्या आहेत. मद्रास इलाख्यांत तांदुळाची किंमत गेले ४० वर्षांत जवळ जवळ २१ पटीवर आली आहे व बाजरी जोधळे यांची दुपटी जवळ आली आहे. खाण्याचे धान्याशिवाय परदेशी पाठविण्यासाठी जी धान्ये तयार करण्यां- त येतात, त्यांच्या किमतीही वाढल्या आहेत. कापसाची किंमत मात्र फार कमी जास्त होते व ती वाढली नाही.