पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३८०) शी जातो. मुंबई व मध्यप्रांतांत परदेशी पाठविण्यासाठीच गहुं करतात. कापू- सही देशांत जास्त खपूं लागला आहे व पूर्वीचे मानाने पेरदशांस थोडा जातो. या देशांत खनिज तेलाचा जास्त प्रसार होऊ लागल्याने गळिताची धान्ये पर- देशी जास्त जाऊ लागली आहेत. ज्या प्रांतांत परदेशी जाण्याचे धान्यच लोकांचे खाण्याचे मुख्य धान्य असते, त्या भागांत मात्र परदेशांत धान्य गेल्याने लोकांस लागणारा धान्य संग्रह कमी होण्याचा संभव आहे, परंतु ब्रह्मदेशांत जेथें अशी स्थिति आहे, तेथे पीक कमी आले तर परदेशी माल कमी जातो असा अनुभव आहे. गहूं ज्या भागांत पिकतो त्या प्रांतांतून तो परदेशी गेल्याने लोकांचा पुरवठा कमी पडतो असे होत नाही, यास दोखला असा आहे की, ज्या साली गहं परदेशों विशेष जातो त्या साली इतर धान्ये त्या प्रांतांत विशेष येतात असे दिसत नाही. एकंदरीत ही धान्ये परदेशी गेल्याने देशांतील धान्य संग्रह अपुरा होतो असें होत नाही परंतु परदेशास धान्ये गेल्याने जो पैसा रयतेस मिळतो तो त्यांस फार उपयोगी पडतो. अन्नसामुग्री-आतां लोकसंख्येचे मानाने अन्नसंग्रह पुरेसा आहे किंवा नाहीं याचा विचार करावयाचा आहे. या देशांतील लोकसंख्येपैकी पुष्कळ लोक फक्त शेतकीवरच अवलंबून असतात, यामुळे पर्जन्य कमी झाला की, त्या भागांतील पुष्कळ लोकांचे हाल होतात व अन्नाचे तुटीपासून व तजन्य रोगापासून ते मृत्यु मुखी पडण्याचा संभव असतो. तरी साधारण विचार पाहतां धान्यावरच लो- कांचा सर्व प्रकारे निर्वाह होत आहे असें नाहीं; शेतकन्यांचे वाडग्यांत व म- ळ्यांतून भाजीपाला पुष्कळ पिकतो व दुभती जनावरे असतात त्यांचेपासून दूध निघते, त्यांची धान्यसंग्रहास जोड असते. ही निखालस वनस्पतिजन्य अ- नच खाणारांची गोष्ट झाली; समुद्राचे व नदीचे काठी राहणारे लोकांचा मा- शांवर ही बरेच अंशी निर्वाह होतो; मांस खाणारे लोकही पुष्कळ आहेत. अंश. तः मांस खाणारे लोक जरी सोडले तरी मांसावर निर्वाह करणारे लोकांची संख्या १३ कोटी आहे. तेव्हां अन्नसंग्रहाचा विचार करतांना भाजीपाला दूध व मांस यांची जी अनसंग्रहास जोड मिळते त्याचा विचार केला पाहिजे. अन्न संग्रहाचे संबंधाने असावी तशी माहिती मिळत नाहीं; नुस्ते अमुक एकरांत अमुक पीक होतें असें ठरवून त्या मानाने देशांत किती उत्पन्न होते व एक इस- माचे पोटास किती लागते याचा हिशेब धरून अमुक लोकांस अन्नसंग्रह पुरेसा आहे व अमुक लोकांस अन्न मिळत नाही असा हिशेब काढतात. या संबंधाने