पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३७९) जास्त पिके काढण्याने तोटा होत नाही. या देशांतील जमीन पीक घेत गेल्या- पासून कसांत कमी होत नाही असा दशवार्षिकी रिपोर्टीत अभिप्राय आहे; डॉक्टर व्होएल्कर यांचा अभिप्राय याहून भिन्न आहे; ते ह्मणतात की, जमि- नींचा कस जात आहे किंवा नाही ते पाहण्यास साधने नाहीत तरी साधारण मानाने पाहिले तर जमिनीत पीक केलें झणजे तितके मानाने जमिनींचे पोषक गण कमी झालेच पाहिजेत. इतर देशांतील जमिनीत जे पीक येते त्या मानाने पाहतां या देशांत कमी येते, हे या गोष्टीचे त्यांचे मते दुसरें प्रमाण आहे. पोषक द्रव्ये जी कमी होतात ती खत घालून पुरी केली पाहिजेत, व खताचे पदार्थ परदेशास फार जातात यामुळे व जळणाचे तोट्यामुळे खतास उपयोगी पडण्यासारखे पदार्थ जाळण्याचे कामी फार लागतात, यामुळे, जमिनीस पोषक द्रव्ये मिळण्याची साधनें कमी होत चालली आहेत, या साठी जमिनीस जास्त खत मिळण्याची तजवीज सरकारांनी केली पाहिजे, या मुद्यावर व्होएल्कर साहेबांचा मोठा कटाक्ष आहे. मोठे शहरांजवळ सोनखताचा व दुसरे प्रकारचे खताचा उपयोग बागाइताचे कामी पुष्कळ करण्यांत येऊ लागला आहे. पाट- बंधारे व विहिरी वाढल्याने, खतांचा उपयोग उत्तरोत्तर जास्त होत गेल्याने, व दोन पीके घेण्याची वहिवाट जास्त वाढल्याने, जमिनींचे उत्पन्न चांगले वाढत जाण्याचा संभव फार दिसत आहे. जनावरे-शेतकीचे वाढीचे मानाने जनावरांचीही संख्या वाढत आहे. या संबंधाने माहिती अपुरी आहे तरी एकंदरीत गेले ६ वर्षांत पूर्वीपेक्षां शेत- कीचे व दुभते जनावरांत ३० टक्के वाढ झाली आहे असे दिसते. शेतकीचे गुरांची किंमत वाढली आहे. पिके व अन्न सामुग्री-शेतकीचे भागांत कोणते पीक किती जमिनीत लागवड करण्यात येते हे सांगितलेच आहे. बंगाल्यांतील माहिती अजमासांचीच असते, तेव्हां तो प्रांत सोडून देऊन पाहिले तर लागण जमिनीपैकी ७८ पासून ९० टक्के जमिनीत खाण्याचे धान्यांचे पीक होते. व-हाडांत मात्र परदेशांस जाणारे पदार्थांची लागवड फार होते. धान्ये परदेशांत पाठ- विण्यासाठी किती जमिनीत व देशांतील खपासाठी किती जमिनीत करतात हे सांगणे शक्य नाही. खालचे ब्रह्मदेशांत तांदुळाचेच मुख्य पीक होते व त्या- पैकी निमे परदेशांस जाते. बंगाल, मद्रास व आसाम प्रांतांतून तांदूळ परदेशी थोडा जातो. पंजाब व वायव्य प्रांताचे भागांत खाण्याचे मुख्य धान्य गहूंच आहे व देशांत पुरून उरण्यासारखा संग्रह असेल तरच तो या प्रांतांतून परदै-