पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३७८ ) संस्थानें, बडोदें व गुजराथेतील संस्थानें, पंजाबांतील शीखांची संस्थाने यांतील व अशा इतर संस्थानांतील लोकवस्ती इंग्रजी प्रांतांप्रमाणेच दाट आहे. मैसूरचे व हैदराबादचे काही भागांत वस्ती पातळ आहे, परंतु तिकडे पर्जन्य अशाश्वत असतो यामुळे वस्ती वाढणे शक्य नाही. हैदरावादेपैकी पूर्वेकडील प्रांतांत, मध्य हिंदुस्थानांतील व झैसूरचे काही भागांत, मध्य प्रांतांतील काही संस्थानांत बा. हेरचे लोक जाऊन राहण्यास थोडीशी सवड आहे, तरी या भागांत ही मोकळे असलेले क्षेत्राचे मानाने लागवडीस योग्य जमीन निघेल असें नाहीं. येथपर्यंत वाढत जाणारे लोकसंख्येचा गुजारा करण्यासाठी जास्त जमीन लागवड करणे हे एक साधन आहे, त्या बद्दल विचार झाला. दुसरे साधन मटलें ह्मणजे लागवडी जमिनीपासून जास्त पीक येण्याची तजवीज करणे हे आहे व अलीकडे लोकही या साधनाचे जास्त अवलंबन करूं लागले आहेत. जमिनीची धारणा केल्यास हल्लींपेक्षा जास्त पीक येईल यांत काही शंका नाही. शेतकीचे संबंधाने नवीन पद्धति घेण्यास या देशांतील शेतकरी मागेपुढे करतात असे नाही, त्या नवीन गोष्टी फायद्याच्या आहेत असे त्यांचे प्रत्ययास मात्र आले पाहिजे. या पूर्वी अशा प्रकाराने सुधारणा सुरूही झाल्या आहेत. पाणी देऊन गव्हाचे पीक केलें ह्मणजे जास्त येतें असें पंजावांतील शेतकऱ्यांस दिसतांच, त्यांनी तसें करण्याचे सुरू केले ; धारवाडाकडे विलायती कापसाचे, बंगाल्यांत जूट, कुर्गा- कडे बंदाचे पीक केले असतां चांगला फायदा होतो असे दिसतांचे लोकांनी तशी पीके करण्याचे सुरू केले. सरकारांनी कालवे केल्यावर त्यांचाही लोक उपयोग चांगला करून घेऊ लागले आहेत व विहिरींपासून वागाईतही वाढत चालले आहे. या देशांत विहिरीपासून जें बागाईत करतात तें उत्कृष्ट व युरो- पांतले प्रमाणे चांगले असते असा डॉक्टर व्होएल्कर यांचा अभिप्राय आहे. वागाइतापासून पीक जास्त होतें हाच एक फायदा आहे असे नाही, तर पर्जन्य अनिश्चित आहे असें भागांत बागाईत वाढल्याने पर्जन्य कमी असतो त्या साली ही पीक मिळते हा मोठा फायदा आहे. गेले ७ वर्षांत वागाईत सुमारे एकपंमचांश वाढले आहे. गेले १० वर्षात जमिनीत दोन पिके घेण्याचाही प्रघात जास्त वाढला आहे. भात शेती जमिनीत थंडीचे दिवसांत डाळ दाणा किंवा गळिताची धान्ये काढ- ण्याची वहिवाट पूर्वीपासून आहे. दुसरे जमिनीत दोन पिके घेण्याचे अलीकडे चालू झाले आहे. सालोसाल नवीन जमीन जितकी लागवडीस येते, त्याचे दुप्पट जमिनीत दोन पिके घेण्याची नवीन पद्धति सुरू होत आहे असे दिसते. दोन पिके घेतात तेथे जमिनीची मशागतही चांगली करतात, तेव्हां एकंदरीत