पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३७७) गिरी जिल्हा हे आहेत. दर मैली बिहारांत वस्ती ६६७ आहे. रत्नागिरी जिल्ह्यां- त वस्ती २८२ आहे तरी लागवडीस योग्य जमीन फार थोडी असल्याने जमिनीचें मानाने वस्ती जास्त होते. पंजावांतील डोंगरा जवळील प्रदेश, अयोध्या प्रांत व मध्य प्रांतांतील नर्मदेचे काठचा प्रदेश यांत वस्ती बहुतेक पूर्णपणे वाढली आहे. हिंदु लोक एखादे परकी ठिकाणी तुटल्यासारखे जाऊन वस्ती करून रहात नाहीत. वस्तीपासून लांब नाही असें ठिकाणी, किंवा जेथें गेल्याने मागील संबंध तुटल्यासारखा होत नाही इतके अंतरावर, जमीन असेल तर लोकवस्ती सहज वाढते. ब्रह्मदेशांत व सिंधेत लागवड करण्याजोगी जमीन पुष्कळ शिलक असल्याने वस्ती वाढण्यास अडचण पडत नाही. वायव्य प्रांत व अयोध्या प्रांत यांत डोंगराचे भागांतील जमीन दुसरे लागवडी जमि- नीचे जवळ असल्याने तेथें ही वस्ती वाढत आहे. आसामांत चहाचे लागवडीचे कामावर गेलेले लोक पुढे तेथेंच कायमचे रहिवाशी होऊन राहतात. इतर प्रांतांत अशी सोईची व श्रम न करता लागवडीस येण्यासारखी जमीन फार थोडे ठिकाणी आहे, त्या मानाने इतर दाट वस्तीचे भागांतून लोकांस तेथें जा- ऊन राहण्यास सवड थोडीच आहे. मुंबई इलाख्यांत चांगली सुपिक व लागव- डीस येण्यासारखी जमीन पंच महालांत व खानदेशाचे डोंगरी भागांतच राहिली आहे. मध्य प्रांतांत डोंगरी भागांत जमीन आहे परंतु त्यांतील पुष्कळ जमिनीतील जंगल कायम ठेवणे जरूर आहे, ती जमीन सोडली तर लागव- डीस मिळण्यासारखी जमीन थोडीच रहाते. बंगाल प्रांतांत डोंगराचे बाजूचे प्रदेशांतच काय ती लागवडसि येण्यासारखी जमीन राहिली आहे. साधारण- पणे विहारांत अतिशय दाट वस्ती झाली आहे, आसासांत लोक जाऊन राह- ण्यास अजून पुष्कळ सवड आहे, बाकीचे भागांत मध्यम प्रकारची स्थिति आहे. इंग्रजी राज्यांतील प्रांतांपेक्षा संस्थानांत लोकवस्ती कमी आहे, तेव्हां तिकडे लोकांस राहण्यास जाण्यास सवड आहे असें सकृद्दर्शनी दिसते, परंतु थोडा जास्त विचार केला ह्मणजे संस्थानांत ही वसाहात करण्यास विशेषशी जागा नाही असे दिसून येईल. इंग्रजी प्रांतांचे लोकवस्तीचे मध्य प्रमाण संस्थानांतले- पेक्षा जास्त येतें तें गंगानदीचे काठचे प्रांतांत जी अतिशय दाट वस्ती आहे त्यामुळे येते; व संस्थानांतील वस्तीचे सामान्य प्रमाण कमी पडण्याचे कारण राजपुतान्यांतील वालुकामय ओसाड भागांत व काश्मीराजवळील डोंगराळ भागांत वस्ती फार पातळ आहे हे होय; या भागांत वस्ती वाढण्यास फारसा अवकाश नाही. हे पातळ वस्तांचे भाग सोडून दिले तर मलबार किनाऱ्यावरील