पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३७६ ) ज्यांस त्यांचे कामाबद्दल जमीनी मिळाल्या आहेत, किंवा ज्यांस कामाबद्दल पि- कापैकी अंश किंवा बलुते मिळते असे लोक ह्मणजे मजूरदार, सुतार, लोहार, तांबट, न्हावी, गवंडी, कोळी, तेली, कुंभार, चांभार, गांव कामगार, भिक्षुक वगैरे, हे प्रत्यक्ष शेतकरी लोकांत मिळविले ह्मणजे शहरें धरून शेकडा ८४ व शहरें सोडून शेकडा ८८ लोक शेतकीवर अवलंबून आहेत असे दिसते. या शिवाय दुकानदारी, शिंपीगिरी, सावकारी वगैरे शेतकीशी संबंध नसणारे १० प्रकारचे धदेवाले लोक शेकडा सुमारे ५३ आहेत. या शिवाय इतर व्यवसायाचे लोक शेंकडा ९.६९ शिलक रहातात. लागवडी जमीन-शेतकीवर निर्वाह करणारे लोकांची संख्या सर्वांत फार मोठी आहे. त्यांचे उपजीविकेचे मुख्य साधन जी जमीन तिचे संबंधानें पाहिले तर तिचे क्षेत्र मर्यादित आहे, ती पाहिजे तितकी वाढवितां येण्यासा- रखी नाही. जमिनींचे उत्पन्नापासून जितके संख्येस अनाचा पुरवठा होण्यासा- रखा आहे तितकी लोकसंख्या हल्ली सर्वत्र होऊन गेली आहे असें नाहीं, तरी कांहीं प्रांतांची तशी स्थिति होत चालली आहे. या विषयाचा विचार करतांना किती जमीन लागवडीस आली आहे व किती येण्याची राहिलेली आहे हे पहि- ल्याने पाहिले पाहिजे. या संबंधाने सर्व प्रांतांत चांगली माहिती मिळत नाही, जी थोडी माहिती मिळते तिजवरून साधारणपणे असे दिसते की, पाऊस निय- मित पडतो असे ठिकाणी पूर्वीच वाहीत असलेले जमीनी जवळील जमीनी झपाट्याने लागवडीस येत चालल्या आहेत. विरल- लोकवस्तीचे भागांत हा क्रम जास्त जारीने सुरू आहे. ब्रह्मदेशांत गेले १० वर्षांतच लागवडी जमिनीची दिढीने वाढ झाली आहे. आसामांत जमीन रिकामी आहे तरी, लोकांची स्थिति भिन्न असल्यामुळे वाढ ८ टक्केच झाली आहे. कुर्ग प्रांतांत वाढ १२ टक्के झाली आहे. मद्रासेंत गेले ४० वर्षांत जिराईत जमीन ३३ टक्के व वागाईत जमीन ५० टक्के जास्त वाढली आहे. पंजाव व सिंध प्रांतांत गेले १० सालांत शेकडा २८ व २२ टक्के वाढ झाली आहे. मुंबईस नवीन सहें केलेल्या जमिनी पत्रकांत वारंवार दाखविण्यांत येत असल्याने, किती वाढ झाली ते चांगले समजत नाहीं तरी, इतर प्रांतांचे प्रमाणाने वाढ झाल्याची दिसत नाही. बंगाल्याचे संबंधाने दाखले मुळीच नाहीत. वायव्य व अयोध्या प्रांतांत विशेष वाढ झा- लेली नाही. व-हाडांत मूळ लागवडीस असलेली जमीन इतकी आहे की, या प्रांतांतून पुष्कळ धान्य इतर ठिकाणी जाण्यास शिलक राहते. वाढती लोकसंख्या व तिची सोय-लोकवस्तीही काही भागांत जमिनीचे मानाने फार झाली आहे. असे भाग बिहारचा उत्तर भाग व रत्ना- 2