पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२३) णजे मायोक याचे अमलाखाली असतो तितका व त्याचे खालील पायरी ह्मणजे कांहीं गांवागांवाचे मेळे ही होय, व यांचे वर थुग्यी ह्मणून अंमलदार नेम- लेला असतो. सिव्हिल राज्यव्यवस्था चार प्रकारचे नौकर लोकांचे हाती असते. पहिल्या वर्गाचे काव्हेनांटेड नोकर लोक ( करारनामा केलेले ), दुसऱ्या वर्गाचे स्टाट्यु- टरी, तिसऱ्या वर्गाचे अनकाव्हेनांटेड नौकर लोक व चवथ्या वर्गाचे स्टाफ कोअर या लष्करांपैकी दिवाणी कामांत असलेले नौकर लोक असें नोकरांचे चार वर्ग आहेत. काव्हेनांटेड ( ह्मणजे करार केलेले ) असें लांस मूळ नांव पड- ण्याचे कारण असे आहे की, त्या नौकर लोकांस नेमणूक होण्याचे वेळी एक करार सही करून द्यावा लागे, व तसा इतर नोकर लोकांस द्यावा लागत नसे अजूनही हा करारनामा देण्यात येतो. त्यांत व्यापार करणार नाही, नजर घे- णार नाही व खतः साठी व कुटुंबासाठी पेनशनाची वर्गणी भरीन वगैरे शतों असतात. आतां शाळा, इंजिनियरिंग, जंगल वगैरे खात्यांत नौकर नेमून पाठा- वितांना त्यांचे जवळूनही करारनामा लिहून घेण्यांत येतो; तेव्हां पहिल्या वर्गाचे लोकांसच काव्हनांटेडे ह्मणजे सनदी हे नांव अन्वर्थक राहिले नाही. अलीकडे काव्हेनांटेड हे नांव जाऊन सिव्हिल सव्हिस आफ इंडिया हे नांव देण्यांत आले आहे. स्टाटयूटरी हे नांव सनदी नोकर लोकासाठी राखून ठेविलेले जागां- वर ३३ व्हिक्टोरिया चा० ३ या स्टाटयूट ह्मणजे कायद्याप्रमाणे नेमलेले लोकांस देण्यांत येतें. इंडियन स्टाफ कोअरही पलटण सन १८६१ साली राणीचे हुकसाने ( रायल- वारंटावरून ) स्थापन करण्यांत आली. कामेशनरी अमलांत वरिट जागांवर व संस्थानांतील एजन्ट व रेसिडेंट या जागांवर या पलटणी पैकी पुष्कळ लोक नेम- ण्यांत येतात. पूर्वी मद्रास व मुंबई इलाख्यांत वेगळालीं स्टाफ कोअर पलटणे असत; परंतु हल्ली ती सर्व एक होऊन सांस इंडिअन स्टाफ कोअर असें नांव प्राप्त झाले आहे. या ठिकाणी काव्हेनांटेड सव्हिसबद्दल थोडीशी हकीगत दिली असतां अम्रा- संगिक होणार नाही. ईस्ट इंडिया कंपनी ही नुसती व्यापारी मंडळी होती तों पर्यंत त्यांचे नोकर व्यापारी, वखारीवाले व कारकून असेच असत; पुढे वाद- शाहाकडून यांस दिवाणी प्राप्त झाल्या नंतर ही सन १७७२ साल पर्यंत सर्व व्यवस्था पूर्वीप्रमाणे एतद्देशीय कामगारांकडूनच होत होती. सदरचे साली कं- पनीने राज्य व्यवस्था प्रत्यक्ष आपले हाती घेतली, व नंतर सन १७९३ सा-