पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२२) राज्य व्यवस्थेसाठी प्रांतांचे भाग केलेले आहेत, त्यांस जिल्हे असें ह्मणतात. असे जिल्हे २४९ आहेत. या संख्येत ब्रिटिश बलूचिस्थान, आंदमान बेटे व लुशी लोकांचा नुकताच घेतलेला प्रांत हे येत नाहीत. जिल्ह्यावर अधिकारी कलेक्टर किंवा डेपुटी कमिशनर हा असतो, व तो न्याय खात्याशिवाय बाकीचे सर्व खात्यांचा मुख्य असतो. जमीन वाव, स्टांप वगैरेचा वसूल तो करितो ; तोच मुख्य माजिस्ट्रेट असतो, व खालचे माजिस्ट्रेट व पोलीस यांचेवर त्याची देखरेख असते. तसेंच तुरुंग, शाळा, रस्ते, दवाखाने, जंगल, रजिस्ट्रेशन, वगैरेंचे स्थितीचे संबंधानेही त्यास साधारण देखरेख करावी लागते. स्थानिक खराज्य व्यवस्थेप्रमाणे चालणारे कामांवर त्यास देखरेखीचा अधिकार ठेविला आहे. हे अंमलदार जिल्ह्यांत फिरतीवर जातात, त्यापासून त्यांस त्यांचे अम- लांतील प्रांतांची माहिती होते, व हताखालील लोकांचे कामांवर देखरेख होते व रयतेस दाद लागण्यास सुलभ साधन होते. असे प्रकाराने यावरिष्ट अंमलदा- रांचा रयतेशी प्रत्यक्ष संबंध असल्याने आणखी एक मोठा फायदा होतो, तो असा की, सरकारचे प्रतिनिधि ह्मणजे नुसते सह्या करणारे यंत्र नसून त्यांचे अत्यंत अगत्य वाळगणारे असतात अशी त्यांस प्रतीति येते. ह्या सर्व कामांशिवाय लोकांची सांपत्तिक, सामाजिक, राजकीय व आरोग्य संबंधाने स्थिति कशी आहे ह्याबद्दलही त्यांस सरकारास माहिती द्यावी लागते. याचे मदतीस असि- स्टंट व डेपुटी-कलेक्टर असतात, व ते कलेक्टर नेमून देईल त्याप्रमाणे कामें करितात. जिल्ह्याचे पोट विभाग केलेले असतात त्यांस तहशिल किंवा तालुके ह्मणतात. त्यांचेवर मामलेदार किंवा तहशिलदार किंवा मुखत्यारकर (सिंधप्रांतांत ) अस- तात. त्यांचेकडे मुलकी व माजिस्ट्रेटी काम असते. या अंमलदार लोकांचा रयतेशी अतीशय निकट संबंध असल्यामुळे हे जिल्हाधिपतीचे खालोखाल मह्- त्वाचे अंमलदार आहेत. तालुक्याचे खालची राज्य व्यवस्थेची पायरी ह्मणजे गांव किंवा खेडी, यांत एक गांवचा मुख्य पाठील असतो. तो गांवचा वसूल करितो, व त्यास थोडा पोलिशीचा अधिकार असतो. त्याचे मदतीस कुलकर्णी किंवा गांवचा फडणवीस व दुसरे नौकर असतात. बंगाल्यांतील व्यवस्था थोडी वेगळी आहे. या प्रांतांत सायची कायमची दर ठरोती झाली अस- ल्यामुळे जिल्ह्याचे विभाग करतांनां वसुलाचे सोईचे विचारापेक्षां पोलिस किंवा माजिस्ट्रेटी कामाची सोय जास्त पाहिली जाते; व या कारणाने जिल्ह्याचे पोट विभागांची ( ठाण्यांची ) हद्द तहशील किंवा तालुक्यापेक्षा मोठी असते. ती व्यवस्थाही सर्वत्र सारखी नसते. ब्रह्मदेशांत तहशिलाचे साम्यतेचा भाग ह्म-