पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३७४) चालणाऱ्या व मदतीशिवाय चालणाऱ्या शाळांच्या अधिकाऱ्यांचे व सरकारी विद्याखात्यांतील अधिकाऱ्यांचे वरचेवर एकत्र वादविवाद होण्याचे प्रसंग यावेत. या योगाने सरकारी मदतीने शाळा चालविण्याच्या पद्धतीस जास्त बकळटी येणार आहे. ह्याशिवाय एज्युकेशन कमिशननें प्रत्येक वर्गाच्या शिक्षणासंबंधाने अनेक महत्वाच्या सूचना केल्या आहेत परंतु त्या विस्तारभयास्तव येथे देता येत नाहींत. भाग विसावा. लोकस्थिात. हिंदुस्थान देशाचें लोकस्थितीचे वर्णन करणे ह्मणजे मोठाच विकट विषय हाती घेणे होय. विस्ताराचेच संबंधाने पाहिले तर, या देशास एक देश ह्मण- ण्यापेक्षा एक खंड ह्मणणे जास्त शोभेल. खंडांत वेगळाले देशांतील जमिनचे प्रकार, लोकांच्या जाति, त्यांचे भाषाभेद, त्यांच्या रहाण्याच्या तन्हा, यांचे संबंधाने जितके फरक दृष्टिगोचर होतात तितकेच या देशांतील वेगळाले भागांत दिसतात. उदाहरणार्थ समुद्र किनाऱ्या जवळील समशीत व उष्ण अशी हवा व तीस अनुरूप असा त्या लोकांचा आयुष्यक्रम, व थंडी व उष्णता यांचा कडे- लोट होतो असे पंजाबासारखे भागांतील स्थिती व तेथील लोकांची रहाण्याची तन्हा, ही घेतली तर वेगळाले प्रांतांत किती फरक पडतो ते दिसते. या देशाची पश्चिमेकडील देशांशी तुलना करण्याचा तर मुळींच मार्ग नाही. इकडील व तिकडील रीतिरिवाज भिन्न आहेत व लोकमान्यता ही इकडे जशी वंश परंपरेनें व वहिवाटीस अनुसरून चालते तशी तिकडे असत नाहीं; तिकडे लोकांत मान्यता होण्यास मोठे कुलांत जन्म होणे हे पुरत नाही. ती आंगचे कर्तबगारीवरच मिळवावी लागते. असे स्थितिवैचित्र्य असल्यामुळे लोकस्थिती संबंधानें प्रांतवार वेगळालें वर्णन दिले आहे. धंदेवार लोकांची वांटणी-प्रांतवार विचार करण्यापूर्वी सर्व देशास सामान्यतः लागू पडणाऱ्या अशा काही गोष्टी आहेत, त्यांचे संबंधाने पहिल्याने विचार केला पाहिजे. प्रथमतः कोणते धंद्यांत किती लोक आहेत हे पाहूं. या