पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चा प्रसार व्हावा. ( ३७३ ) (२) विद्यार्थी वर्गावर सुपरिणाम घडून येईल अशा प्रकारचे शिक्षणपद्धती- (३) विद्यार्थ्यांच्या नियमबाह्य वर्तनावर दाव ठेवणे. (४) त्यांच्या वर्तणुकीबद्दल नोंद ठेवणे. (५) बोर्डिंग हौसिस ( भोजनालये ) शाळांना लागून घालणे. (६) शाळेत किंवा शाळेचे बाहेर विद्याथ्यांच्या वर्तनावर लक्ष ठेवतील असे मानिटर ! मालचाटे) नेमणे. (७) विद्यार्थ्यांस अमुक वयाच्या पुढे शाळेत घेऊ नये असा निबंध ठरविणे. (८) एका शाळेतून दुसऱ्या शाळेत विद्यार्थी घेण्याबद्दल निमम ठरविणे. (९) खेळावयाच्या जागा व तालिमखाने शाळांना जोडणे. प्रिन्सिपल व प्रोफेसर यांनी आपल्या खाजगी वर्तनाने विद्यार्थ्यांना योग्य वळण घालून द्यावे, अशीही हिंदुस्थानसरकाराने सूचना केली होती. ज्या कॉलेजांतून व शाळांतून धार्मिक शिक्षण देण्यांत येत नाही तेथे केवळ नीतिशिक्षण अलगरीतीने देता येईल की नाही या संबंधाने शंका काढण्यांत आली होती. ही अडचण टाळण्याकरितां एज्युकेशन कमिशननें अशी सूचना केली आहे की, ज्या कॉलेजांतून धार्मिक शिक्षण पूर्णरीतीने देता येईल अशी कॉलेजें सरकारच्या मदतीने कोढण्यात यावी. हे मत हिंदुस्थानसरकारास पूर्ण रीतीनें पसंत पडले आहे ; तथापि विद्याखाव्याने नीतिशिक्षणाबद्दल घ्यावा तसा अद्याप अनुभव घेतलेला नाही व जोपर्यंत नीतिशिक्षण देण्याचा प्रयत्न विद्या- खात्याने केला नाही तोपर्यंत त्या कामी यशप्राप्ति होणार नाही असें हिंदुस्थान सरकारास वाटत नाही. ह्या मतास अनुसरून एज्युकेशन कमिशनच्या शिफार- शी प्रमाणे हिंदुस्थानसरकारने स्थानिक सरकारास अशी शिफारस केली आहे की, सर्वसाधारण धार्मिक मते एकवट करून एक नोतिशिक्षणाचे पुस्तक तयार करावे व तें सरकारी व इतर शाळांतून सुरू करावे. या प्रश्नाचा विचार अद्याप व्हावयाचा आहे. एज्युकेशन कमिशनने शिक्षण पद्धतीची सुधारणा करण्यासाठी विद्वान मंड- ळ्या स्थापन करण्याविषयीं जी सूचना केली ती हिंदुस्थानसरकारनें पसंत कली आहे. सरकारी अधिकारी व ज्यांना विद्येची विशेष अभिरुचि आहे अशा इतर लोकांनी शिक्षणाचे संबंधाने परस्परास असलेली माहिती व परस्परांचे विचार प्रदर्शित केले तर त्यापासून फार फायदा होईल ही गोष्ट हिंदुस्थान सरकारास पूर्ण संमत आहे, व त्यांची अशी विशेष इच्छा आहे की, सरकारच्या मदतीने