पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३७२) भवति न भवति करण्याचा काल अद्यापि प्राप्त झालेला नाही. इंग्लंडांतून येणारे अध्यापक हल्लीप्रमाणे पुष्कळ वर्षपंर्यत न नेमतां थोडी वर्षेच त्यांची नेम- णूक करण्याबद्दल विचार चालू आहे. चांगले शिक्षक नेमण्याबद्दलही कमिशननें विचार केला होता. ह्या कामी हिंदुस्थानसरकारच्या मते जास्त सुधारणा झाली पाहिजे व स्थानिकसरकारांनी या गोष्टीकडे विशेष लक्ष पोचवावे असे त्यांनी फर्माविले आहे. हिंदुस्थानसर- कारच्या मते हिंदुस्थानांतील विद्यार्थ्यांचे वर्तन नीतिशुद्ध बनण्यास नीतिमान व विद्याव्यासंगी असा शिक्षक वर्ग असणे अत्यंत जरूर आहे. लोकलबोर्डे व म्युनिसिपालिट्या ह्यांकडे प्राथमिक व माध्यमिक शाळांची ज- वाबदारी सोपवावी असा कमिशनचा अभिप्राय होता व हिंदुस्थानसरकारास तो पसंत पडला. मद्रास इलाख्यांत ह्या शाळांतून सरकारने आपलें अंग अजिबात काढून घेतले आहे. मुंबई इलाख्यांत बहुतेक प्राथमिक शाळांतून वर माध्यमिक शाळांतून सरकारने आपले अंग काढून घेतले आहे. पंजावांतही तीच स्थिति आहे. बंगाल्यांत खेड्यांतील शाळांतून सरकारने आपले अंग काढून घेतले आहे, परंतु म्युनिसिपालिटीच्या हद्दीतील शाळांची स्थिति तशी नाही. बाकीच्या प्रांतांत सदहूंप्रमाणेच बहुतेक व्यवस्था आहे. लोकलबोर्ड व म्युनिसिपालिट्यांतील मेंबर विद्येच्या देखरेखीच्या कामी विद्याखात्यांतील अधि- काऱ्यांना जास्त साह्य करितील अशी हिंदुस्थानसरकारने आशा दाख- विली आहे. धंदे शिक्षण व उद्योग शिक्षण ह्या संबंधाने वर संक्षिप्त माहिती देण्यांत आ- लीच आहे. हिंदुस्थान सरकारचे थोडक्यांत असे मत आहे की, हिंदुस्थानांतील हल्लीच्या व्यापाराच्या स्थितीकडे लक्ष ठेवून अवश्यक तेवढे शास्त्रीय पद्धतीचे शिक्षण देण्यात यावे. मुख्य मुख्य व्यापाराच्या ठिकाणी उपयुक्त अशा शिक्षणा- च्या शाळा काढाव्या व देशांतील भांडवल जसजसे वाढत जाईल त्या मानाने ही शिक्षण पद्धत परिपक्क दशेस आणावी. आतां शाळांतून व कालेजांतून विद्यार्थ्यांस नीतिशिक्षण व योग्य वळण कसे मिळेल ह्या प्रश्नाचा निर्देश करावयाचा आहे. हिंदुस्थान सरकाराने पुढे लिहिलेल्या सूचना स्थानिक सरकारांकडे पाठविल्या आहेत व त्याप्रमाणे वेग- लाले प्रांतांत वरेच गोष्टींसंबंधाने व्यवस्था सुरू झाली आहे. (१) शिक्षक वर्ग तयार करण्यासाठी ट्रेनिंग स्कुलें व कॉलेजें काढावी, व तेथे समाधानकारक रीतीने जे आपला विद्याकम पुरा करतील त्यांसच शिक्षक नेमण्यांत यावें.