पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

माहिती दिली आहे. आतां शिक्षणांत असलेले विद्यार्थ्यांचे प्रमाण शिक्षणास योग्य असे प्रजेचे संख्येशी कसें बसतें तें सांगतो. लोक संख्येपैकी शेकडा १५ शाळेत जाण्यासारखी मुलें आहेत असें धरावें असें हिंदुस्थान सरकारांनी ठरविले आहे. हे प्रमाण साधारण अजमासासाठीच घेतलेलें आहे ; साधारण सर्व वर्गीचे लोक घेतले ह्मणजे हे प्रमाण चांगले उपयोगी पडते, परंतु युरोपिअन, पारशी किंवा ब्रह्मो असे लहान संख्येचे लोकसमुदाय, ज्यांत शिक्षणाचा प्रसार फार झाला आहे असे वर्गीचे लोकच घेतले ह्मणजे तें प्रमाण चुकतें सन १८९१-९२ साली शाळेत जाण्यासारखे मुलांपैकी नऊ मुलांत एक मुलगा शाळेत जात होता व ५० मुलीपैकी एक मुलगी शात जात होती असे दिसते. वेगळाले जातींत शिक्षणाचा प्रसार किती झाला आहे-कोणते जातीत शिक्षणाचा किती प्रसार झाला आहे हे पाहण्याचे आहे. वेगळाले वर्गाचे लोकांतील शाळेत जाण्यास योग्य मुलांपैकी शिक्षणांत शेकडा किती होती हैं पुढील माहितीवरून दिसून येईल. शाळेत जाण्यास योग्य असे मुलां- जात किंवा धर्म. मुलीपैकी शिक्षणांत शेकडा किती होती त्यांचे प्रमाण-सन १८९१-९२ सालाबद्दल. १०.५ ११.७ महंमदीय. पारशी (मुंबई व मध्यप्रांतांत). शीख. १४३.१ बुद्ध धर्माचे (ब्रह्मदेशांत). १६.८ नेटीव ख्रिश्चन. ४९.३ ७९.१ युरोपिअन व युरोशिअन. ८६.५ यहुदी (मुंबई) ब्रह्मो (बंगाल) २१२.६ यांत पारशी व ब्रह्मो यांचे प्रमाण जास्त वाढण्याचे कारण वर सांगितलेच आहे. आणखी एक प्रकाराने विद्यार्थिवर्गाची फोड करणे जरूर आहे, ती अशी की, वेगळाले प्रकारचे शिक्षणांत वेगळाले जातीचे लोक कसे प्रमाणाने आहेत,