पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संख्याही दिली. या वर्गाचे शिक्षणाच्या वर दिलेले शाळांशिवाय इतर काही शाळा आहेत त्यांची संख्या व त्यांतील विद्यर्थ्यांची संख्या खाली लिहि- ल्याप्रमाणे:-- १८८१-८२ १८९१-९२ १८९३-९४ विशेष शिक्षणाच्या इतर शाळांची संख्या. २८२ ३४५ त्यांतील विद्यर्थ्यांची संख्या. १९८० ८६०८ ९१८९ स्त्रीशिक्षण-या भागांत ठिकठिकाणी शाळांची व विद्यार्थ्यांची संख्या दाखल करतांना स्त्रियांचे संबंधाने ज्या संस्था आहेत त्यांचा उल्लेख केला आहे, तरी हे शिक्षण किती थोडें होत आहे व तें ही किती कोते आहे, हे स्पष्ट रीतीने दिसण्यासाठी त्या सर्व हकीकतींचे एका वेगळ्या सदरांत एके ठिकाणी पुनरुच्चारण करणे इष्ट दिसते. स्त्रियांस शिक्षण उदरनिर्वाह करण्यास अवश्यकतेचे नस- ल्यामुळे व बालविवाहाचे चालीमुळे व अशाच दुसऱ्या सामाजिक कारणामुळे स्त्रीशिक्षणाचा प्रसार बरोबर रीतीने होत नाही. शिक्षण फारच थोड्या मुलींस मिळते व तेंही प्राथमिक शिक्षणाचे पलीकडे फारसें जात नाही. काही प्रांतांत मात्र वरिष्ठ प्रतीचे शिक्षण देण्याकडे सुधारणेच्छु लोकांचा कल होत चालला आहे. ही जी स्थिति सांगितली ती हिंदु व मुसलमान वगैरे एतद्देशीय लोकांचे संबंधाने आहे. युरोपीअन, युरेशिअनस्, पारशी, यदुदी वगरे वर्गाचे लोकांची स्त्रीशिशणासंबंधाने स्थिति सर्व प्रकाराने भिन्न आहे. स्त्रीयांस वरिष्ट प्रतीचे शिक्षण देण्यासाठी स्वतंत्र कालेजे नाहीत. पुरुषांसाठी जी कालेजें आहेत त्यांतच स्त्रियांस शिकावे लागते. सन १८९१-९२ साली कालेजांत ७६ स्त्रिया शिकत होत्या ; त्यांत आर्टस् कालेजांत ४५, वैद्यकीचे कालेजांत २९ व शिक्षणाचे कालेजांत २ अशा होत्या. त्या साली मध्यमवर्गाचे शिक्षणाच्या इंग्रजी वरिष्ठ प्रतीच्या शाळा ( हायस्कुलें) ७६ होत्या व त्यांत ७०६६ विद्यार्थिणी होत्या. मध्यमवर्गाच्या इंग्रजी शाळा १५७ होत्या व त्यांत विद्यार्थिणी ९३९६ होत्या व याच वर्गाच्या देशीभाषेच्या शाळा २०१ होला व त्यांत विद्याथिणी १५०९२ होत्या. सन १८८१ साली वरिष्ठ प्रतीच्या इंग्रजी शाळा १४६ होत्या व त्यांत ५६३६ विद्यार्थिणी होत्या; देशीभाषेच्या शाळा ४४ होत्या व त्यांत ७३० विद्यार्थिणी होत्या. पूर्वी शाळांची संख्या दिली आहे त्यांत मुलींचे शाळेत काही मुलें येतात त्याची संख्या सामिल आहे सन १८९१-९२ साली मुलींचे मध्यम वर्गाचे शाळांत जाणारे मुलांची संख्या