पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३६४) लोहाराचे व ओतान्याचे काम शिकविण्यांत येते. हायस्कुलांत शेतकीचा विषय शिकविण्याची तजवीज आहे. मुंबईस पशुवैद्यकीचे कालेज आहे. याप्रमाणे मुंबई इलाख्यांत वर सांगितलेले तीन ही विषयासंबंधाने शिक्षण देण्यात येते. या शिवाय धंद्याच्या लहान शाळा आहेत त्यांची संख्या एकंद- रींत येईल. बंगाल्यांत धंदेरोजगारांचे स्थितीसंबंधाने विशेष अमलदार नेमून चौकशी करण्यांत आली आहे. त्याने केलेले सूचनांचा अजून विचार चालू आहे. मात्र एंजिनिअरिंग कालेजांत यांत्रिक ज्ञानाचे शिक्षण देण्यासंबंधानें तेजवीज कर- ण्यांत आली आहे. कलकत्त्याचे स्कूल आफ आर्टमध्ये चित्रे काढणे, चित्रे करणे, कोरीव काम वगैरे शिकवितात.. यो इलाख्यांत धंदेशिक्षणाच्या दुसऱ्या लहान शाळा आहेत, परंतु त्यांची स्थिति वाईट आहे. वायव्य प्रांताचे सरकारचे मताप्रमाणे त्या प्रांतांत परकीय भांडवलाने जे धंदे चालू झाले आहेत ते चालविण्यास जें यांत्रिक ज्ञान लागतें तें देण्याची तजवी- ज करावी ह्मणजे पुरे आहे. या विषयाचा विचार करण्यासाठी एक कमिटी नेमली होती, तिचे सूचनांचा विचार चालू आहे. अलीकडे लखनौ येथे एक धंदे शिक्षणाची शाळा वे कानपूर येथे एक शैतकीची शाळा अशा घालण्यांत आल्या आहेत. पंजाबांत धंदेशिक्षण देणाऱ्या शाळांस मदत देण्याचा ठराव झाला आहे. लाहोर येथील मेयो स्कूल आफ इंडस्ट्रियल आर्ट या शाळेत इमारतींस शोभा आणण्या संबंधाची कारागिरीची कामें विशेष शिकविण्यांत येतात. लाहोर येथे एक पशुवैद्यकाची शाळा आहे. मध्यप्रांतांत शेतकीची एक व एंजिनिअरिंगची एक अशा शाळा आहेत. धंदे शिक्षणासंबंधानें कांहीं स्कालरशिपा ठेवल्या आहेत; त्या मिळणारे विद्यार्थ्यांस बंगाल नागपूर रेल्वेचे कारखान्यांत शिक्षण मिळतें. ब्रह्मदेशांत ही असेच प्रकारची व्यवस्था करण्यांत आली आहे. आतां धंदे शिक्षणासंबंधाच्या शाळांची व त्यांतील विद्यार्थ्यांची संख्या देतो. १८८१-८२ १८९१-९२ १८९३-९४ कलाकौशल्याच्या शाळांची संख्या. ६ त्यांतील विद्यार्थ्यांची संख्या. ४३९ १०४८ १३४८ औद्योदिक शाळांची संख्या. ६९ ६९ त्यांतील विद्यार्थ्यांची संख्या. १५०९ ३८६० ३८८४ विशेष प्रकारच्या शिक्षणाच्या शाळांचे येथपर्यंत वर्णन दिले व त्यांची ४४