पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

या शाळेतील शिक्षणापासून प्राचीनचे बुडते धंदे तरते झाले इतकेच नाही, तर त्यांत सुधारणाही होत आहे. महाराणी सरकारचे जुबिली प्रीत्यर्थ फंड जमा होऊन व्हिक्टोरिया टेक्निकल इन्स्टिट्यूट स्थापन झाले आहे, परंतु त्या संस्थे-- ची इमारत तयार झाली नसलेमुळे शिक्षणाचे काम अजून नीट चालू झाले नाही या इलाख्यांत मद्रास येथे एंजिनिअरिंग कालेज आहे त्या संबंधाने विशेष सांग- ण्याची जरूर नाही. शेतकीचे ही एक कालेज आहे, त्यांत शेतकांचे शिक्षण देण्यांत येतें. मद्रास सरकारांनी धंदे शिक्षणा संबंधानें एक विशेष व्यवस्था चालू केली आहे, ती अशी की, वेगळाले शास्त्रीय, कलाकौशल्याचे व धंद्याचे उपयोगी विषयांत परीक्षा घेऊन त्यांत सरटिफिकीटें देण्यांत येतात. ही व्यवस्था कर- ण्याचा हेतु असा आहे की, प्रथमतः लोकांत परीक्षणाचे द्वारे त्या विषयांचे अभ्यासाची जिज्ञासा उत्पन्न करून देऊन, नंतर तानमान पाहून धंदे शिक्षणा- च्या शाळा घालून शिक्षण देण्याचे सुरू करावें. मुंबई इलाख्यांत धंदे शिक्षणाच्या संबंधाने काही व्यवस्था झाली आहे. या बाबतीतील इलाखे सरकारचे ठरावांत धंदे शिक्षणाचें सामान्य शिक्षण व विशेष शिक्षण असे दोन वर्ग केले आहेत; पहिले वर्गाचे शिक्षणांत सर्व धद्यांस उपयोगी पडण्यासारखे हातास वळण लावणारे शिक्षण येते व दुसरे वर्गात विशेष धंद्यांचे शिक्षण येते. या ठरावांत (१) शेतकी, (२) कलाकौशल्याचे धंदे व (३) यांत्रिक ज्ञान यांचे शिक्षणाबद्दल विचार केला आहे. कलाकौशल्याचे शिक्षणा बद्दल मुंबईचे स्कूल आफ आर्ट यांत काही विशेष व्यवस्था करून सोय केली आहे. या शाळेत चित्रे काढण्याचे व करण्याचे व ती कोरण्याचे शिकवितात. सन १८९० साली या शाळेस धंदे शिक्षण देण्यासाठी रे वर्कशाप ( कारखाना ) जोडण्यांत आला व त्यांत लाकडांवरील कोरीव काम, धातूचे काम, सोनारकी, गालीचे करणे वगैरे कामें शिकविण्यांत येतात. लार्ड रिपन यांचे स्मारकासाठी व महाराणी सरकारचे जूविलीचे वेळी मुंबईचे मुनसिपालिटीने दिलेले व इतर रीतीनें जमा झालेले पैशांतून व्हिक्टोरिया टेक्निकल इंस्टिटयूट स्थापन झाले आहे व ही संस्था सरकार, मुंबई मुनसिपालिटी, रेल्वे कंपन्या व गिरणी- वाल्यांची असोसिएशन यांचे वर्गणीने चालत आहे. या शाळेत सृष्टपदार्थवि- ज्ञान, यंत्र शास्त्र, वगैरे विषय शिकविण्यांत येतात, व याच संस्थेस जोडून असलेले रिपन टेक्स्टाइल इन्स्टिटयूट आहे त्यांत विणकरी संबंधाने शास्त्रीय व व्यावहारिक शिक्षण देण्यात येते. पुणे येथील सायन्स कालेजांत एंजि- निअरिंग, शास्त्रे, शेतकी व फारेस्ट्री (जंगल संबंधी ज्ञान) हे विषय शिकविण्यांत येतात. या कालेजांत एक वर्कशाप ( कारखाना ) आहे त्यांत