पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३६२) कारण हे ज्ञान ह्मणजे धंदे रोजगारांतील भांडवलाची साथ देणारी वस्तु आहे ; तेव्हां तें शिक्षण आगगाड्यांचा व कारखान्यांचा प्रसार होत जाईल, खनिज द्रव्ये काढण्यास सुरवात होईल व व्यापाराची वृद्धी होत जाईल त्या मानाने महत्वाचे होत जाणार आहे. हे शिक्षण जरूरीप्रमाणे आस्ते आस्ते देत गेलें पाहिजे असें आहे, तरीही हल्लींचे देशस्थितीचे मानाने सरकारांनी हे शिक्षण देण्यास सुरवात करण्यास योग्य वेळ प्राप्त झाली आहे व या कामी उदार गृह- स्थांनीही लक्ष घातले पाहिजे. सुरवात करण्याची ती हल्लींचे स्थितीचे मानाने करून, पुढे प्रसंगाप्रमाणे शिक्षणक्रमांत सुधारणा करीत जावी. ही हकीकत धंदे शिक्षणापैकी वरिष्ठ प्रतीचे शिक्षणा संबंधाने आहे. धंदे शिक्षणाचे प्राथमिक ज्ञानासं- बंधानें स्थिती भिन्न आहे व तें शिक्षण देण्याचे सुरू करण्यास विशेषशा अडचणीही नाहींत. एकंदरीत हे सर्व विचार मनांत आणून हिंदुस्थान सरकारांनी असे ठरविले की, विशेष प्रकारचे धंद्याचे शिक्षण ग्रहण करण्याची योग्यता येण्यास अवश्य अस- णारे जे सामान्य प्रकारचे शास्त्रीय शिक्षण, तें हल्लींचे शाळांतील शिक्षण क्रमांत वर सांगितल्याप्रमाणे चित्रलेखन व शास्त्रीय विषयांची मूल तत्वे ह्या विषयां- चा समावेश करून, सुरू करावे व विशेष प्रकारचे धंदे शिक्षण देण्याचें तें देशां- तील ज्या भागांत जे धंदे रोजगार चालू असतील त्यांचे अनुरोधानें व त्या धद्यांत उपयोगी पडण्यासारखे लोक तयार होतील असे प्रकारचे देण्याची तज- वीज करावी. ही व्यवस्था करण्यास सोईचे व्हावें ह्मणून प्रत्येक प्रांतांत कोण कोणते धंदे विशेष प्रकाराने चालू आहेत व त्यांची स्थिती कशी आहे याबद्दल चौकशी करावी, व विलायतेस घंदे शिक्षणासंबंधानें कमिशननें जो रिपोर्ट केला आहे त्याचे अनुरोधानें इकडे धंदे शिक्षण देण्यासंबंधाने कशा व्यवस्था कराव्या हे सुचविण्यासाठी त्या बाबतींत विशेष ज्ञान आहे असे लोकांची एक कमिटी नेमावी इ. इ. हा ठराव झाल्या नंतर वेगळाले प्रांतांत धंदे शिक्षणाचे बाबतींत कांहीं नवीन व्यवस्था करण्यांत आल्या व पूर्वी त्या बाबतीत ज्या व्यवस्था होत्या त्या सुधारण्यांत आल्या; तेव्हां आतां नवीन व जुन्या व्यवस्था असा भेद न करतां वेगळाल्या प्रांतांत धंदे शिक्षणाचे संबंधानें कशी स्थिती आहे त्याचे वर्णन देतो. अर्थात ग्रंथाचे मानाने ही माहिती अत्यंत संक्षिप्त रीतीने येईल. मद्रास इलाख्यांत धंदे शिक्षण देण्याचें मद्रास स्कूल आफ आर्टस् या शाळेत चालू आहे. तेथें चित्रे काढणे व चित्रे खोदण्याचें शिकविण्यांत येते व त्याच शाळेचे दुसरे एका भागांत सुतारकी, कोरीव काम, गालिचे व सतरंजा विणणे, सोनारी काम, मातीचे भांड्यांवर चित्रे काढणे वगैरे कामें शिकविण्यांत येतात.