पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०४८ - ५ (३६१) साली त्यांनी या विषयासंबंधानें कशी व्यवस्था करावी याबद्दल स्थानिक सर- कारांस काही सूचना केल्या व त्या कालापर्यंत या विषया संबंधानें कांहीं व्यव- स्था झाली नव्हती ही गोष्ट त्यांचे नजरेस आणून दिली. हिंदुस्थान सरकारांनी असे सुचविले होते की, चित्रलेखन व शास्त्रांची मूलतत्वे हे विषय अगदी खा- लचे दर्जाच्या शाळा सोडून बाकीच्या सर्व शाळांत शिकविण्यात यावे व सृष्ट- पदार्थ विज्ञान शास्त्राचे अभ्यासासंबंधाने दुर्लक्ष्य होउं नये. चित्रलेखन शिकवि- ण्यासंबंधाने बहुतेक प्रांतांत कमी जास्ती परंतु काही तरी तजवीज झाली आहे व तो विषय मध्यमवर्गाच्या शाळांतूनच आतां शिकविण्यांत येतो. शिवाय चित्रलेखन व कलांचे शिक्षण देण्यासाठी स्वतंत्र शाळाही स्थापन केलेल्या आहेत. ह्या शाळा किती आहेत व त्यांत विद्यार्थी किती आहेत तें येणें प्रमाणे- शाळांची संख्या. विद्यार्थांची संख्या. सन १८८१-८२ ५ ४३९ १८९१-९२ ६ १८९३-९४ १३४८ शाळांतून सृष्टपदार्थ विज्ञान शास्त्राचे काही भाग शिकविण्यासंबंधाने मुंबई, मद्रास, बंगाल, आसाम व मध्यप्रांतांत व्यवस्था आहे; वायव्यप्रांत व पंजाबांत या बद्दल व्यवस्था करण्याचा विचार ठरला आहे. बाकीचे प्रांतांत शास्त्रीय विष- य शिकविण्याबद्दल व्यवस्था झालेली नाही. धंदे शिक्षण देण्याचे संबंधानेही हिंदुस्थानसरकारांनी स्थानिक सरकारांस त्याच वेळी सूचना केल्या होत्या व पुढे त्या सरकारांचा अभिप्राय घेऊन त्या बद्दल कोणते तत्वांवर व्यवस्था करण्याची या बद्दल ठराव केला आहे. त्या ठरावांतील मुद्दे असे आहेत की, शाळांतून शिक्षण देण्याचे ते फक्त भाषाज्ञाना संबंधीच न देतां व्यवहारांत उपयोगी पडण्यासारखे विषयांचेही द्यावें ; शेतकी सारखे धंद्यांपासून वाढत जाणारे जनसमाजाचा गुजारा लागण्यासारखा नाही, तेव्हां त्यांस उदरनिर्वाहास साधन करून देण्यासाठी व देशांतील सांपत्तिक द्रव्यांचा योग्य उपयोग करून घेण्याकडे जास्त प्रवृत्ति होत जावी व जगांतील चढाओढीत यादेशांतील लोकांचा निभाव लागावा ह्मणून धंदे शिक्षण देणे अव- श्य आहे. खरें धंदे शिक्षण ह्मणजे व्यापारोपयोगी जिन्नस चांगले तन्हेचे तयार करण्यास मनुष्य वाकबगार होणे हे आहे. ही वाकबगारी येण्यास बुद्धि, कल्पना- शक्ती, हस्त कौशल्य, आवडनिवड करण्याचे सामर्थ्य, ही सर्व चांगली सुधारली पाहिजेत- ह्या प्रकारचे धंदशिक्षण देण्याचें तें त्या ज्ञानाचा उपयोग करून धे- ण्यास धंदे रोजगारांत घालण्यास भांडवल तयार असेल तरच देण्याचे आहे ;