पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३५९) शिकत होत्या. प्राथमिक शिक्षणाच्या शाळा ३३५५८ होत्या व त्यांत ४०७५७२ मुले व ३१२८८ मुली अशा शिकत होत्या. शिक्षक वर्ग तयार करण्याच्या व धंदेशिक्षणाच्या शाळा-वर सांगितलेल्या तीन प्रकारच्या शाळांशिवाय बाकी राहेिलेल्या दोन प्रकारच्या शाळांची आतां माहिती द्यावयाची राहिली आहे. त्या शिक्षकवर्ग तयार कर- ण्याच्या व धंदे शिक्षणाच्या शाळा होत. पहिल्या वर्गाच्या शाळांचे तीन प्रकार आहेत. वरच्या प्रकारच्या शाळांत इंग्रजी भाषेच्या द्वारे शिक्षण देण्यात येते. मद्रास इलाख्यांत शिक्षणाचे संबंधाने एक कालेज आहे व मद्रास युनिव्हर्सिटी शिक्षणाचे कामांतील नैपुण्याबद्दल पदवी देते. दुस-या ह्मणजे मध्यम प्रतीच्या शाळांतून देशी भाषेत शिक्षण देण्यांत येते. मद्रास इलाख्यांत मात्र अशा प्रका- रच्या काही शाळांतून इंग्रजी भाषेतच शिक्षण देण्यात येते. तिसऱ्या ह्मणजे प्राथमिक शिक्षणाच्या शिक्षकवर्ग तयार करण्याच्या शाळांत निरनिराळ्या प्रांतांत निरनिराळे शिक्षणक्रम सुरू आहेत. ह्याहीपेक्षा खालच्या दरजाच्या शाळा थोड्या वर्षापूर्वी बंगाल व मद्रास इलाख्यांत स्थापन झाल्या आहेत. निर्- निराळ्या प्रांतांत कमीजास्त प्रमाणाने बालशिक्षकांचीही योजना शिक्षणाचे कामी करण्यांत येते. सन १८९१।९२ साला पर्यंत या प्रकारचे शाळांतील मध्य- म व प्राथमिक शिक्षणाच्या क्रमांतील भिन्नता सुस्पष्ट नव्हती ; तथापि ह्या साली प्राथमिक शिक्षणाच्या ४९ शाळा असून मध्यम प्रतीच्या शिक्षणाच्या २५ होत्या. सरकारच्या मदतीने चालणाऱ्या खाजगी शाळांत एतद्देशीय ख्रिश्चन विद्यार्थांची संख्या बरीच मोठी होती. हल्ली शाळांत आहे त्या पेक्षां विद्यार्थी वर्गाचा वर्तनक्रम जास्त नीतिशुद्ध असला पाहिजे असा हिंदुस्थानसरकारचा अभिप्राय आहे ; तेव्हां हल्ली शिक्षकवर्ग तयार करण्याचे कामास विशेष महत्व आले आहे हे उघड आहे. सन १८९१-९२ साली शिक्षक तयार करण्याच्या शाळा ११५ होत्या व त्यांत विद्यार्थी ४३५३ होते. सन १८८१-८२ साली ह्या शाळा ९६ होत्या व विद्यार्थी ३५१९ होते. सन १८९३-९४ साली शाळा १५१ व विद्यार्थी ४३७० होते. स्त्रीशिक्षक तयार करण्याच्या सन १८९१-९२ साली ३७ शाळा असून त्यापैकी बऱ्याच शाळांत प्राथमिक व मध्यम प्रतीच्या शिक्षणा- पलीकडे शिक्षण देण्यांत येत नव्हते. एकंदर ७९३ विद्यार्थिणी पैकी ४४८ एत- द्देशीय निश्चन धर्माच्या होत्या. ह्याचे कारण असे दिसते की, ह्या वर्गातील मुली शिवाय इतर जातीच्या प्रतिष्ठित व सुशिक्षित घराण्यांतील फारच थोड्या मुली शिक्षणाचा धंदा चालविण्यास उत्सुक असतात. या शाळांची संख्या खाली दिली आहे.