पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३५८) क्रम मध्यस्थ आहे. यांत प्राथमिक व वरिष्ठ शिक्षणाचा एकच क्रम आहे, तथापि पुष्कळसे विषय शिकण्याचे विद्यार्थ्यांचे इच्छेवर ठेविलेले आहे. एकंदरीत सर्व प्रांतांतील प्राथमिक शिक्षण क्रमाची कडेची मर्यादा सारखीच आहे. प्राथमिक शिक्षणाच्या शाळांपैकी मोठी संख्या लोकल बोर्डीचे व मुनसिपालिट्यांचे शा- ळांची आहे; सन १८९३-९४ साली या शाळांची संख्या १६८०८ होती. सर- कारी शाळा ४६५ होत्या. संस्थानांत २२८१ होत्या. सरकार, लोकलबोर्ड किंवा म्युनसिपालिट्या यांच्या मदतीने चाललेल्या शाळा ५६७४३ होत्या. मदतीशि- वाय चाललेल्या शाळा २१०२८ होत्या. या संख्येत मुलांचे व मुलींचे शाळांचा समावेश झालेला आहे. त्यांत मुलांच्या शाळा ९१७३० व मुलींच्या शाळा ५५९५ होत्या. या सर्व शाळांत मिळून ह्या साली २७७८७६६ मुलें व १६८७६४ मुली अशी होती. मिळून एकंदर विद्यार्थ्यांची संख्या २९४७५३० होती. प्राथ- मिक शिक्षणाचा प्रसारे गेले दहा वर्षांत कसा झाला आहे ते पुढील कोष्टका- वरून दिसून येईल. प्राथमिक शिक्षणाच्या शाळा. मुलांच्या मुलींच्या शाळा विद्यार्थी विद्यार्थी साल शाळा सन १८८११८२ ८३५९१ २०७०९६३ २६७८ ८५२७९ सन १८९११९२ ९१८८१ २६८०४२४+ ५२२८ १५०९५४* १८९३-९४ ९१७३० २७७८७६६ ५५९५ १६८७६४

  • यांत मुलांचे शाळांत येणान्या ११९८४८ मुली सामिल आहेत.

+ यांत मुलींचे शाळांत येणारी ६२२९ मुलें सामिल आहेत. आतां पब्लिक (सार्वजनिक) शाळा यांची व्याख्या वर दिली आहे त्यांत न येणाऱ्या खासगी शाळा आहेत त्यांचे बद्दल काही माहिती देतो. एजुकेशन कमिशनचे पूर्वी या शाळांचा दाखला मुळीच ठेवण्यांत येत नसे, तेव्हां ही मा- हिती सन १८९१-९२ सालाबद्दलच दिली आहे. ह्या शाळा बहुतेक प्राथमिक शिक्षणाच्याच जास्त आहेत. वरिष्ठ प्रतीचे शाळांत अरबी, पार्शी, संस्कृत, किंवा दुसऱ्या प्राच्य भाषांचें शिक्षण देण्यांत येते व प्राथमिक शिक्षणाचे शाळांत लिहिणे वाचणे, कुराणपठन किंवा असे तन्हेचे विषय शिकविण्यांत येतात. वरिष्ट प्रतीच्या शाळा ५५५९ होत्या व त्यांत ६८६९६ मुलें व ३५५ मुली