पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३५७ ) दाकून फिरून ते इंग्रजीत शिकावे लागल्याने दुप्पट वेळ लागतो असें हुतेक उभयपक्षांस ही कबूल आहे. या प्रश्नाचा निकाल अनुभव येईल त्या मा- गाने काले करूनच लागण्याचा आहे. नौकरीची लायकी ठरविणारी परीक्षा वेगळी करण्यांत आल्याचे वर सांगि- टलेच आहे. त्याप्रमाणे, मुंबई, मद्रास, व वायव्य प्रांत यांत व्यवस्था सुरु ाली आहे. पंजाब इलाख्यांतील विश्वविद्यालयांत कारकुनीचे संबंधानें व व्या- गराचे संबंधाने एक स्वतंत्र परीक्षा घेण्याचे ठरविले आहे. प्राथमिक शिक्षण. प्राथमिक शिक्षण ह्मणजे जनसमाजाचे स्थितीचे नानाने व्यवहारास जरूर असणारे विषयांचे ज्ञान देशी भाषांच्या द्वारे करून देण हे होय. विश्वविद्यालयांच्या प्रवेश परीक्षांस साधनीभूत असे हे शिक्षण अ- पलेच पाहिजे असें नाहीं. सर्व प्रकारच्या शिक्षणास सरकाराकडून मदत व्हावी असे जरी आहे तरी, प्राथमिक शिक्षणाचे संबंधाने देशस्थितीचा विचार पाहतां सरकाराने ह्या शक्षणाला जास्त मदत दिली पाहिजे व लोकलफंडापैकी शिक्षणासाठी काढून ठेविलेली रक्कम व सरकारांतून शिक्षणासाठी देण्यात येत असलेली रक्कम यांचा माघेल तितका विनियोग याच शिक्षणाकडे करावा असे हिंदुस्थान सरकारांनी ठरविले आहे. वरिष्ट व मध्यम प्रतीचे शिक्षणांतून सरकार अजीबात आंग काढून घेणार किंवा त्यास प्रतिबंध करणार असें नाही. तर पूर्वी वरिष्ठ प्रतीचे शिक्षणास जास्त मदत देण्यात येत असे तशी न देतां प्राथमिक शिक्षणास पूर्वीपेक्षा विशेष मदत देण्यात यावी आणि वरिष्ठ प्रतीच्या शिक्षणाचा खर्च उत्पन्नांतून भागेल असें करून प्राथमिक व वरिष्ठ शिक्षणाचा क्रम सारखा चा- लावा अशा बेताने सरकारचा या पुढे वर्तनकम रहावयाचा आहे. हा ठराव एजुकेशन कमिशनचे सूचनांस अनुसरून आहे. प्राथमिक शिक्षण देतांना ते जास्त व्यवहारोपयोगी होईल असे द्यावें गणित, हिशेव, महत्वमापन व शेतकी, आरोग्य व कलाकौशल्य यांस उपयोगी पडण्या- सारखा सृष्टपदार्थविज्ञान शास्त्राच्या ज्ञानाचा त्यांत समावेश करावा असें हिंदुस्थान सरकारचे मत आहे. मुंबई इलाख्यांत खालच्या शाळांतील शिक्षण हे विश्व विद्यालयाचे प्रवेश परीक्षेस उपयोगी पडणा-या शिक्षणाचाच भाग आहे असे मानण्यात येते. बंगाल्यांत खालचे वर्गाचे शाळांत लेखन, वाचन, व हिशेब- ठिशेव हेच कायते विषय शिकविण्यात येतात. सर्व हायस्कुलांत या शिक्षणा- च्या वरच्या पायरीचे शिक्षण देण्यांत येते व त्यांतही विश्वविद्यालयाच्या उपयोगी पडेल असें शिक्षण वरच्या वर्गातून मात्र देण्यात येते. मद्रास येथील