पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ह्मणून दाखल करतात. यासाठी वरील विद्याथ्र्यांची शिक्षणाचे पायरी प्रमाणे फोड करून सन १८९१-९२ सालाबद्दल माहिती देतो. हायस्कुलांतील. ५७४६० प्राथमिक ( इंग्रजी). मध्यमवर्गाचे ९८६७३ वरचे प्रतीचे. ५९८८८ खालचे प्रतीचे ९५९४२ यावरून खरोखर वरचे प्रतीचे इंग्रजी शिकणारांची संख्या किती लहान आहे हे लक्षात येण्यासारखे आहे. एज्युकेशन कमिशनची चौकशी होईपर्यंत मध्यम वर्गाचे इंग्रजी शिक्षण विश्ववि- द्यालयांत प्रवेश होण्यास उपयोगी पडेल असे प्रकारचे एकदेशयि होत असे. त्या कमि शनाने व्यापार किंवा इतर धंद्यांत पडण्यास विद्यार्थ्यांचे आंगीं पात्रता यावी अशा प्रकारचे व्यावहारिक शिक्षण देण्यात यावे अशी सूचना केली होती. ही सूचना हिंदुस्थान सरकारास ही पसंत पडून यांनी असे फर्माविलें की, विद्यार्थ्यांचे ल- क्ष्य व्यापार व औद्योगिक धंद्यांकडे लागेल अशा त-हेचे शिक्षणास मदत देण्यांत यावी; व यासाठी शिक्षण देणे ते हायस्कुलांतच देण्याची सुरवात करावी. मः ध्यमवर्गाचे शिक्षण कोणत्या भाषेत द्यावे ह्या संबंधाने हिंदुस्थान सरकारांनी असा अभिप्राय दिला आहे की, ज्या विद्यार्थि वर्गाचे शिक्षण मध्यमवर्गातच पुरें होतें अशा विद्यार्थ्यास तें देशी भाषेच्याच द्वारे दिले असतां जास्त उपयो- गी होईल. बंगाल्यांतील अनुभवारून असे दिसून आले आहे की हायस्कुलांतून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांस देशी भाषेतूनच शिक्षण प्रथमतः चांगले मिळो- ल्याने पुढील अभ्यासासही चांगले सोईचे होऊन परिणाम फार चांगला दृष्टोत्प- त्तीस येतो. परकीय भाषेतून शिक्षण दिल्याने त्या भाषेचे मात्र थोडे तुटपुंजे ज्ञान होते, परंतु विद्यार्थ्यांस शिकविण्यांत आलेले विषय ग्रहण करतां येतील असे प्रकाराने शिकविले न गेल्यामुळे या शिक्षणापासून त्यांचे मनावर कोण- तेही प्रकारचा संस्कार होत नाही. या प्रश्नासंबंधाने वेगळाले प्रांतांतील अधि- कारी वर्गात अजून एकमत झालेले नाही. वेगळाले प्रांतांत कोणते भाषेत शिक्षण देण्याचे या संबंधानें भिन्नभिन्न पद्धति चालू आहेत, परंतु त्यांपैकी चांगली को- णती चावद्दल निर्णय होण्यासारखा अजून कोणतेच पद्धतीचा अनुभव आलेला नाही. देशी भाषेच्या द्वारें इतिहास, गणित व भूगोल या विषयांचे चांगले ज्ञान कमी श्रमांत प्राप्त करून घेता येते व चांत जो वेळेचा फायदा होईल ती इंग्रजी भाषेचे ज्ञान प्राप्र करून घेण्यांत घालवावी असें एक पक्षाचे ह्मणणे आहे. या विषयांचे देशी भाषांचे द्वारे चांगले ज्ञान होतच नाही असें कांहींचे ह्मणणे आहे. युनिव्हर्सिटीचे प्रवेश परिक्षेस बसणारांस हे विषय पहिल्याने देशी भाषेत