पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३५४) आहे. शास्त्रीय विषय अर्वाचीन शोधांचे आधारें शिकविण्यांत येतात. भाषा विषयाचे शिक्षणांत मात्र काही सुधारणा न होतां पूर्वीचेच पद्धतीने शिक्षण देण्यात येते. या कॉलेजांतून शास्त्रीय विषयांवर आजपर्यंत फार उपयुक्त ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. कलकत्ता येथील संस्कृत कॉलेजांत इंग्लिश शिकविण्यास सुरवात झाली आहे. लाहोर येथील प्राच्यविश्वविद्यालयांत प्राच्य भाषा शिक- विण्यासंबंधाने सुधारणा करण्याचे काम चालू आहे लखनौ येथील कॅनिंग कॉलेजची स्थिति कोणतेही प्रकाराने सुधारलेली नाही. इंग्रजी कालेजें सन १८९१-९२ साली १०० व सन १८९३-९४ साली १०९ होती. या १०९ कालेजांपैकी सरकार खर्चाने चाललेली २३ म्युनसिपल व लोकलवोडींनी चालविलेली ५, एतद्देशीय संस्थानांकडून चाललेली २, सरकारी किंवा लोकल किंवा म्युनिसिपल बोडाँचे मदतीने चाललेली ४९ व मदतीशिवाय चाललेली ३० अशी होती.सन १८९१।९२साली बी.ए.चे परीक्षेपर्यंत शिकविणारी कॉलेजें ५८ होती. कॉलेजांत प्रवेश होण्यासाठी जी परीक्षा घेण्यांत येते तीच नौकरी मिळण्यासाठी लायकी ठरविणारी परीक्षा असल्यामुळे कॉलेजांत शिरण्याची इच्छा नसून फक्त नौकरी मिळविण्यासाठीच ह्या परीक्षेस पुष्कळ विद्यार्थी बसत असत. अलीकडे नौकरीची परीक्षा वेगळी करण्यांत आली आहे यामुळे प्रवेश परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या नियमित झाली आहे. मध्यम वर्गाचे शिक्षणाच्या शाळा-एथपर्यंत कॉलेजासंबंधानें संक्षिप्त माहिती दिली आहे. त्यांच्या खालच्या वर्गाच्या शाळा ह्मणजे मध्य- म प्रतीचे शिक्षण देणाऱ्या शाळा होत. या शाळांची संख्या व त्यां- तील विद्यार्थ्यांची संख्या सन १८८१५८२, १८९११९२ व १८९३।९४ साली पुढे दिल्याप्रमाणे होती. या शाळांत दोन वर्ग आहेत (१) हायस्कुले व (२) त्यांचे खालचे प्रतीच्या शाळा; या खालचे प्रतीच्या शाळांत कांहींत इंग्रजी व देशी भाषांत शिक्षण देण्यांत येते व काहींत फक्त देशी भाषांतच शिक्षण देण्यांत येते सन १८८१-८२ साली हायस्कुले व त्यांच्या खालच्या प्रतीच्या इंग्रजी शाळा ह्या हिशेबांचे पत्रकांत एकच वर्गात देत असत. हल्ली हायस्कुले व खालचे प्रतीच्या इंग्रजी व देशी भाषांच्या शाळा वेगळाल्या दाखविण्यांत येतात, तेव्हां सन १८८१-८२ तील व पुढील शाळांची व विद्यार्थ्यांची संख्या पत्रकांत एकासमोर एक अशी तुलने साठी दाखवितां येत नाही. पहिल्याने सन १८८१-८२ बद्दल माहिती देऊन नंतर सन १८९१-९२ व १८९३-९४ साला बदल माहिती देण्यात येईल. ,