पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३५२) युनिव्हासट्या (विश्वविद्यालये) सन १८५७ साली स्थापन झाल्या. वायव्यप्रां- तांतील युनिव्हर्सिटी अलाहाबाद येथे सन १८८७ साली स्थापन झाली. या सर्व लंदन युनिव्हर्सिटीचे नमुन्यावर स्थापन झाल्या असोन त्यांत चानसेलर, व्हाइसचानसेलर, फेलोज व सेनेट ( व्यवस्थापक मंडळी ) अशा प्रत्येकांत असतात. ही विश्वविद्यालये फक्त परीक्षा घेण्याचेच काम कारतात. शिक्षणाचें काम करीत नाहीत; परंतु परीक्षांसाठी विषयक्रम ठरविण्याचे काम ह्यांचे हाती असल्याने ह्यांस शिक्षणाचा क्रमही आपले हातांत ठेवण्यास सांपडते. सन १८८२ साली पंजावांत लाहोर येथे एक विश्वविद्यालय स्थापन झाले त्यांत इतरांप्रमाणे परिक्षणाचे काम करून शिक्षणाचेही काम करण्यांत येते. विश्वविद्यालयांत प्रवेश होण्यास एक प्रवेश परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेस विषय इंग्रजी, देशी किंवा प्राचीन भाषा, इतिहास, भूगोल, गणित व मद्रास व मुंबई इलाख्यांत ह्याशियाव सृष्ठपदार्थ विज्ञानज्ञान असे आहेत. इंग्लंदांतील सोळा वर्षांचे साधारण बुद्धीचे मु- लास जितके ज्ञान असते तितकें या परिक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांस असावें अशा मानाने विषयक्रम ठेविलेला आहे. प्रवेशपरीक्षा झाल्यावर पुढील परीक्षांचें शिक्षण कॉलेजांतून देण्यांत येते. कॉलेजांत दोन पर्याय आहेत. (१) आर्टस कॉलेजें (२) धंदे शिक्षणाची कालेजें. धंदे शिक्षणाच्या कॉलेजांत कायदे, वैद्यक, इंजिनियरींग व शेतकी हे विषय शिकविण्यांत येतात. कॉलेजांतील शिक्षण देशाचे राज्यव्यवस्थेचे किंवा धंद्याचे कामांत विशेष कर्तवगारीने काम करण्यास योग्यता येण्यासारखें देण्यांत येते. विश्वविद्यालयांत आर्टस्, शास्त्रीय विषय, वैद्यक, इंजिनियरींग व कायदे असा आहे. ह्या विषयांत परीक्षा घेऊन वॅचलर आफ आर्टस (बी. ए.) व मास्टर आफ आर्टस (एम्. ए.) व लायसे- शिएस्ट अशा पदव्या देण्यांत येतात. लाहोर विश्वविद्यालयांत प्राच्य ज्ञानाचे शिक्षण ही देण्यात येते व परीक्षा घेउन पदव्या देण्यात येतात. सन १८८१-८२ व १८९१-९२ व १८९३-९४ वेगळाले प्रकारची कालेजे किती होती याबद्दल माहिती देतो. वेगळाले वर्गाची कालेजें. १८८१-८२ १८९१-९२ १८९३-९४ संस्थांचे प्रकार. १ आर्टस कालेजें. -संस्था. -विद्यार्थी. ६७ १०४ १२९८५ ११४ १४३६०