पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३५०) सन १८५९ सालचा खलिता. विशेसंबंधाने दुसरा महत्वाचा खलिता सन १८५९ साली निवा गा. ह्या खलियांत पूर्वांच्या खलियान्वये झालेल्या सुधारणेचें परीक्षण करून त्याचे समर्थन केले आहे. प्राथमिक शिक्षणासंबंधानें मात्र ह्या व पूर्वीच्या खलित्यांत भतभेद आहे. या खलित्यांत सरकारी मदती- च्या पद्धतीने इंग्रजी व इंग्रजी मराटी मिश्रित शिक्षणाच्या खाजगी शाळांची भरभराट होत असल्याबद्दल समाधान दाखविले आहे. प्राथमिक देशी शिक्षणा- चे कामी एतद्देशिय लोकांनी सरकारी मदतींचा बिलकल फायदा करून घेतला नसून त्या शिक्षणाचे कामी लोकांकडून मदत होण्याची आशा निरर्थक होईल असा आशय प्रगट केला आहे. हे काम सरकारनेच हाती घ्यावे व या शिक्षणाच्या प्रसारासाठी जामेनीवर पट्टी बसवून फंड जमवावा अशी शिफारस केली आहे. एजुकेशन कमिशन--या खलियाप्रमाणे सन १८५५ सालापासून शि- क्षणाची व्यवस्था चालू झाली. पुढे सन १८८२ पर्यंत शिक्षणाच्या पद्धतीच्या संबं- धानें विशेष महत्वाचा असा फरक कांही झाला नाही. सन १८८२ झाली हिंदुस्थान सरकारांनी सदरील दोन्ही खलित्याप्रमाणे व्यवस्था कशी चालली आहे, देशांत शिक्ष- णाची स्थिति कशी आहे व विद्याप्रसार किती झाला आहे ह्याची इत्थंभूत चौकशी करण्यासाठी एक कमिशन नेमिलें होते. या कमिशनचे अध्यक्ष सुप्रसिद्ध व विद्वान गृहस्थ सर. वुइल्यम् हंटर साहेब असून शिवाय एक यूरोपियन चि- टणीस व सर्व प्रांतांतून निरनिराळ्या जातींतून निवडलेले सुमारे वीस सभासद त्यांच्या मदतीस होते; व त्यांत कांहीं स कारी नौकर व कांही खासगी लोक ह्या कमीशनने देशांत चोहोंकडे फिरून माहिती मिळविली, व ती रिपोर्टाच्या द्वारे सन १८८३ साली हिंदुस्थान सरकाराकडे सादर केली. त्यांत हिंदुस्था- नच्या त्या वेळच्या शिक्षण स्थितीची साद्यंत माहिती असून भावी सुधारणा कागत्या व कशा कराव्या हेही कमीशनने नमुद केले आहे. कमिशनच्यानजरेस असें आले की, सन १८५४ व १८५९ साली शिक्षणाची जी पद्धत सुरु करण्यांत आली तींत महत्वाच्या अशा बाबतींत अनुभवावरून कोणताही दोष दिसून आला नाही. या कमिशनाने महत्वाच्या सूचना केल्या आहेत त्यांचा पुढं प्रसं- गानुसार उल्लेख करण्यांत येईल. सन १८५४-१८८२ पर्यंतची हकीकत-पहिल्याने विशेष महत्वाची पाह- ण्याची गोष्ट मटली ह्मणजे नवीन शिक्षणपद्धत सन १८५४।५५ साली सुरू झा. ल्यापासून शिक्षणाच्या संस्था व छात्रवर्ग यांत किती वाढ झाली आहे तें पाहण्याचे आहे. सन १८५४ सालच्या पूर्वीची माहिती वर दिलीच आहे. ही वाढ क्रमा क्रमाने कशी झाली तें पुढे दाखल केलेल्या पत्रकावरून दिसून येईल.