पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(४९) (४) विद्यमान सरकारी कॉलेज व हायस्कुले कायम ठेवून जरूरी प्रमाणे आणखी नवी स्थापावी. (५) शिक्षणाच्या मध्यम वर्गाच्या शाळा स्थापन कराव्या. (६)प्राथमिक शिक्षणाच्या देशी अथवा इतर शाळांकडे जास्त लक्ष पोचवावे. (७) सरकारी मदतीने शाळा चालविण्याची पद्धत सुरू करावी. उपयुक्त व्यवहारोयोपगी ज्ञान बहुजन समाजास प्राप्त होईल अशी व्यवस्था करण्याबद्दल हिंदुस्थान सरकारास विशेष रीतीने सुचविले आहे. वरिष्ठ प्रतीच्या शाळांत इंग्रजी भाषेचे शिक्षण देणेचे असोन खालच्या प्रतीच्या शाळांत देशी भाषांतून शिक्षण द्यावें असें फर्माविले आहे. इंग्रजी भाषा शिकण्याची जेथे लोकांना इच्छा होईल तेथेच ते द्यावें; जेथें त्याची गरज नसेल तेथें तें देण्याचे कारण नाहीं असें खलित्यांत मटले आहे. ज्या शाळांत धर्मशिक्षण बिलकूल, देण्यांत येत नसेल त्याच शाळांना सरकारने मदत द्यावी. ज्या शाळांतून व्यवहारोपयोगी शिक्षण देण्यात येत असेल, व्यवस्था चांगली असेल, सरकारच्या देखरेखी खाली ज्या राहतील व विद्यार्थ्यापासन थोडी- का होईना परंतु काहीतरी फी जेथे घेण्यात येत असेल त्या शाळांना त्या ठि- काणों विद्येची अवश्यकता कितपत आहे ही गोष्ट लक्षात घेऊन सरकारने शक्तय- नुसार मदत करावी. ही जी सरकारी मदत द्यावयाची ती विशेष कारणे पाहून व सरकारी परीक्षकांचे अभिप्राय लक्षात घेऊन द्यावी. ज्या ठिकाणी सरकारे- च्या मदतीने स्थानिक गरजा भागविण्यासारखी कॉलेजें व हायस्कुलें पुरेशी अ. सतील तेथें सरकारांनी ती स्थापन करू नयेत; परंतु जेथे स्थानिक गरजा भाग- विण्यासारख्या अशा संस्था नसतील तेथे नवीन संस्था स्थापन करून काही काळपर्यंत सरकारने त्या चालवाव्या. अशा रीतीने सरकारच्या मदतीने चालणान्या शाळा जसजशा वाढत जातील त्या मानाने सरकाराने शिक्षणा- च्या कामापासून आपले अंग हळू हळू काढून घ्यावे; परंतु कोणत्याही शाळेचा सरकारचा आश्रेय न मिळाले मुळे हास होऊ देणें वरावर नाही. विद्यार्थ्यांना स्कालरशिपा देण्याची पद्धत सुरू करून कुनिष्ट प्रतीच्या मध्यम प्रतीच्या, व वरिष्ट प्रतीच्या शाळांचा संबंध जोडण्यात यावा, स्त्री शिक्षणास सरकारने मोक- ळ्या मनानें पूर्ण मदत करावी. प्रत्येक प्रांतांतील मुख्य अधिकाऱ्याने विद्ये- च्या प्रसाराचे कामी साह्य केले पाहिजे; व शाळा खात्यांतील जागा भरतां- ना अशिक्षित मनुष्यापेक्षा सुशिक्षित मनुष्यांचीच योजना व्हावी. खालच्या प्रतीच्या जागा भरतांना सुद्धा निरक्षर मनुष्यापेक्षा लिहितां वाचतां येणा- ऱ्या लोकांनाच पसंत करावें.