पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३४८) 'जमा केले. त्या रकमेचा विनियोग एक कॉलेज स्थापन करण्याकडे करण्यांत आला. हेच हल्लोचें एलफिन्स्टन कॉलेज होय. पुढे त्या मंडळीचे जागी एक बोर्ड स्थापन झाले. पहिल्याने ह्या वोर्डाकडून खाजगी शाळांस मदत देऊन इंग्लिश शिक्षणाचा प्रसार कराविण्याकडे खर्च होत असे. परंतु पुढे एतद्देशीय शिक्षणा- सही त्याच तिीने मदत मिळू लागली. सन १८५४ साली सरकारांतून शिक्ष- णाचे कामों २५०००० रुपये खर्च होत होते. वायव्य प्रांतांत सन १८२३ व १८२५ साली आग्रा व दिल्ली येथे कॉलेजें स्थापन झाली. त्या शिवाय काशीस एक कॉलेज पूर्वीच स्थापन झालेले होते. त्याच सुमारास मोठमोठ्या शहरी हायस्कुले स्थापन करण्यांत आली. थोमासन साहेब यांचे कारकीर्दीत सन १८५० साली जन समाजाचे शिक्षणाचा प्रारंभ झाला. त्यांनी तालुक्यांचे गांवीं एतद्देशीय शिक्षणाच्या वरिष्ठ शाळा व भोंवता- लचे प्रांतांत मध्यवस्तीच्या अशा सोईबार खेडेगांवांत लहान शाळा स्थापन केल्या. वरिष्ठ शाळांचा खर्च सरकारांतून होत असे व खेड्यांतील शाळाचा खर्च भागविणे साठी जमिनवाबीवर शेकडा एक टक्का कर जमिनदारांचे खुषीने बस- विण्यांत आला. सन १८५४ साली ३९२० शाळा, ५३००० विद्यार्थी, असे असून वरिष्ट दर्जाचे शाळांवर सरकारी खर्च १८०००० व कनिष्ठ शिक्षणाचे शाळा संबंधाने ४५००० रुपये असा होत होता. सन १८५४ सालचा खलिता--येथपर्यंत सन १८५४ सालचे पूर्वीची शिक्षणाची हकीकत थोडक्यांत दिली आहे. त्या साली शिक्षणाची पद्धत कशी असावी ह्याबद्दल विलायत सरकारने नवीन नियम केले. ह्या खलित्याला हिंदु- स्थानांतील शिक्षणाची सदन असें नामाभिधान मिळालेले आहे. त्यानंतर सन १८५९ साली हिंदुस्थानच्या स्टेटसेक्रेटरी साहेबांनी एक खलिता काढून सन १८५४ सालच्या खालित्याचे समर्थन केले. ह्या दोनी महत्वाच्या खलित्यांचा सारांश थोडक्यांत देतो. सन १८५४ सालच्या खलित्यांत विद्येचा प्रसार व सुधारणा ( इंग्रजीत व देश भाषांत ) करण्याविषयी हिंदुस्थान सरकारास नि- खून शिफारस केली आहे. ज्या साधनांनी हा उद्दश सिद्धीस नेता येईल त्यांचाही निर्देश केला आहे तो असा- १) शिक्षणाची व्यवस्था लावण्याकरितां एक स्वतंत्र खातें स्थापन करावें. (२) प्रत्येक इलाख्यांतील मुख्य शहरी विश्व विद्यालये ( युनिव्हर्सिट्या) स्थापन करावी. (३) सर्व प्रकारच्या शाळांतील शिक्षकांस शिक्षण पद्धतीचें खरूप चांगले समजण्यासाठी पाठनशाला स्थापाव्या.