पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३४७) विद्यांचे प्रसारासाठी सन १८१९ साली स्कूल सोसायटी नांवांची सभा स्थापन केली. नंतर सरकार तर्फेची कमेटी स्थापन झाली व तिने पुष्कळ वजनदार लोकांचे इच्छेविरुद्ध सन १८२३ साली एक संस्कृत कॉलेज स्थापिलें. त्यानंतर सन १८३० साली डाक्तर डफ नांवाच्या मिशनरी साहेबांनी एक कॉलेज स्थापन केले. सन १८४२।४३ साली सरकार तर्फेच्या कमेव्यांत सुधारणा होऊन कौन्सिल ऑफ एज्युकेशन स्थापन झाले. सन १८५५ सालापर्यंत वरिष्ठ प्रकारचे शिक्षणावरच सर्व खर्च होत असे. त्या साली बंगाल इलाख्यांत १५१ शाळा १३१३६३ विद्यार्थी व ५९४२३० रुपये खर्च असा होता. तरी प्राथमिक शिक्षण फक्त ३२७९ वि- द्यार्थ्यांसच कायतें मिळत होते. मद्रास इलाख्यांत सन १८२६ साली सर टामस मनरो यांनी इलाख्याचे शहरी एक मुख्य शाळा, जिल्ह्याचे शहरीही एक एक वरिष्ठ प्रकारची शाळा व तालुक्याचे ठिकाणी एक एक लहान शाळा स्थापन करण्यासाठी एक बोर्ड स्थापन केले. या बोर्डाने नाही ह्मणावयास एक हाय- स्कूल मात्र स्थापन केले. त्या हायस्कूलाचे रूपांतर होऊन हल्ली त्यास प्रेसिडेन्सि कॉलेज असें ह्मणतात. सन १८३६ साली या बोर्डाची सुधारणा होऊन त्याचे जागी यूनिव्हर्सिटी बोर्ड स्थापन झाले. सन १८५४ साली विद्याखातें स्थापन झाले. त्या वेळी मद्रासेंत स्थापन केलेल्या हायस्कुलाशिवाय बाहेरील प्रांतांत नुकतीच स्थापन झालेली पांच हायस्कूलें व थोड्याशा प्राथमिक शिक्षणाच्या शाळा असून सरकारी खर्च ४५३६० रुपये होत होता. शिक्षणाचे कामी सरका. रचे दुर्लक्ष्य होते तरी मिशनरी लोकांच्या शाळा मदास व तंजावर, मच्छली- पट्टण, तिनिवेली वगैरे बाह्य प्रांतांत स्थापन झाल्या होत्या व त्यांत सन १८५४ साली ३०००० विद्यार्थी शिकत होते. त्या वेळी एतद्देशीय लोकांच्या उद्योगाने स्थापन झालेली संस्था मटली ह्मणजे पचैयप्पाची शाळा होय. ह्या शाळेचा खर्च धर्म फंडांतून भागविण्यात येत असे. मद्रासे प्रमाणे मुंबई इलाख्यांतही विद्यादानाचे कामी मिशनरी लोकांचीच अघाडी होती. त्यांनी मुंबई शहरांत सन १८१४ साली पहिली शाळा स्थापन केली. पुढील साली खाजगी वर्गणीने मुंबई शहरांत व बाहेरील प्रांतांत शाळास्थापन करण्या- साठी एज्युकेशन सोसायटी नांवांची मंडळी स्थापन झाली. त्यानंतर सन १८२२ साली ह्या मंडळीने युरोपियन व युरेशियन लोकांसच शिक्षण देण्याचे ठरविले. त्याचवेळी विद्येचे प्रसारार्थ व शिक्षणाची पुस्तकें तयार करण्यासाठी सुप्रसिद्ध एलफिन्स्टन साहेब यांचे अध्यक्षतेखाली दुसरी एक सभा स्थापन झाली. पुढे सन १८२७ साली एलफिन्स्टन साहेब गव्हरनरचे कामाचा राजीनामा देऊन जाण्याचे वेळी लोकांनी त्यांचे स्मारकासाठी चारलक्ष पन्नास हजार रूपये वर्गणीने