पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३४६) मुख्यतः त्या भाषेस उत्तेजन द्यावें व मुसलमान लोकांस हिंदूलोकांच्या बरो- बराने विद्या मिळून नौकरीत व विशेषतः न्यायखात्यांत शिरण्यास त्यांस सवड मिळावी असा ही संस्था स्थापन करण्याचा उद्देश होता. यानंतर दहा १० वर्षांनी सरकाराने बनारस येथें एक संस्कृत कॉलेज स्थापन केलें. धर्मशास्त्र व संस्कृतभाषा यांचा अभ्यास करून त्यांत पारंगत झालेल्या विद्यार्थीनीं युरोपियन न्यायाधिशांचे मदतनीस व्हावे ह्या उद्देशाने ही संस्था स्थापन करण्यांत आली होती. सन १८१३ साली पार्लमेंट सभेच्या आक्ता अन्वये कंपनी सरकारास नवीन सनद देण्यांत आली. या आक्तांत असा एक ठराव मुद्दाम केला होता की, हिंदुस्थानांतील ग्रंथांचे पुनरुज्जीवन व सुधारणा व्हावी, हिंदुस्थानांतील विद्वान लोकांना उत्तेजन मिळावे व हिंदुस्थानांतील ब्रिटिश राज्यांत राहणाऱ्या प्रजा-- जनांमध्ये शास्त्रीय ज्ञानाचा प्रसार व्हावा, एतदर्थ किमानपक्षी एक लाख रुपये कंपनी सरकाराने खर्च करावे. याच सुमारास दरबारांत फारशी भाषेच्या ऐवजी इंग्रजी भाषेची सुरवात होऊ लागली. तेव्हां अर्थातच इलाख्याच्या मुख्य ठिकाणी देशी भाषांच्या व प्राचीन भाषांच्या ऐवजी इंग्रजी भाषेची जिज्ञासा लोकांस वाट लागली. प्राच्य भाषा व इंग्रजी भाषा यांच्या अभिमान्यां-- मध्ये पुष्कळ वर्षे पर्यंत कडाक्याचा वादविवाद सुरू होता. शेवटी सन १८३३ साली प्रसिद्ध लॉर्ड मेकॉले साहेबांनी इंग्लिश भाषेचा पक्ष धरून तिच्या मंडणार्थ आपले वजन खर्ची घातले. त्या नंतर सन १८३९ साली हिंदुस्थानच्या गव्ह- नर जनरल साहेबांनी आपला अभिप्राय ह्या प्रश्नासंबंधाने नमूद केला. त्यांतील आशय असा आहे की यचपि यूरोपियन ग्रंथ, तत्वशास्त्र, व शास्त्रीय ग्रंथ यांचे अध्ययन इंग्रजी भाषेतच करणे इष्ट आहे तथापि प्राच्य संस्था पूर्वस्थितीत ठेवून त्यांना सरकारचा आश्रय पूर्वीप्रमाणेच मिळावा. इंग्रजी व देशी शिक्षणां- चा मिलाफ करून विद्यार्थ्यांचे अभिरुचीप्रमाणे त्यांना पसंत असेल तें शिक्षण देण्यात यावे. त्यानंतर पुढे दहा पंधरा वर्षांपर्यंत वरिष्ठ व मध्यम प्रतीचे शिक्षण देण्याकडे सरकारचे लक्ष वेधलें होतें. नॉर्थवेस्ट प्रांत शिवायकरून बाकीचे प्रांतांत प्राथ- मिक शिक्षण देण्याचेसंबंधानें तजवीज बहुतेक झालीच नव्हती. बंगाल्यांत सन १८१७ साली कांही श्रीमान गृहस्थांनी वरिष्ठ जातीचे मुलांस शिक्षण देण्या- साठी एक हिंदु कॉलेज स्थापन करण्याचे उद्देशाने एक मंडळी स्थापिली. त्या वेळी स्थापन झालेले हिंदू कॉलेज हलीं प्रेसिडेन्सि कॉलेज या नावाने प्रसिद्ध आहे. पुढे काही एतद्देशीय व यूरोपियन गृहस्थांनी मिळून इंग्लिश व एतद्देशीय