पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३४५) पुष्कळ प्रवाशी स्वेच्छेने परदेशांत प्रवास करून माहिती मिळवितात तिचाही उपयोग करण्यांत येतो. याप्रमाणे काफ्रिस्थान, उत्तर हिंदुस्थानांतील मोठाले नद्यांचे हिमालयांतील व त्याचे पलीकडील उगम प्रांत व तिबेट वगैरे देशांबद्दल शोध झाले आहेत. अफगाणिस्थानांतील लढाईचे वेळी, आफगाणिस्थान व रशि- या यांच्या दरम्यानच्या हद्दी ठरविण्याचे वेळी, त्या भागांतलि माहिती मिळवि- ण्यांत आली. या वरून या खात्याचे मार्फतीने किती महत्वाचे काम होत आहे याची कल्पना होईल. भाग १९वा. शिक्षण. हिंदुस्थानदेशाचा प्राचीन काळचा जो इतिहास उपलब्ध आहे त्यावरून अशी माहिती मिळते की, ह्या देशांतील लोक अशिक्षित असे कधीच नव्हते. त्याकाळी हिंदु लोकांच्या पाठशाला व मुसलमान लोकांचे मदरसे असत. शाळां- तून मुख्यत्वे धर्मशिक्षण देण्यात येत असे; व तेथील विद्यार्थी संस्कृत, अरबी वगरे प्राचीन भाषांचें अध्ययन करीत ह्याशिवाय लहान लहान खेड्यांत लेखन वाचन व हिशेवठिशेव शिकविण्याच्या शाळा असत. या शाळांतून सर्व जाती- च्या मुलांस शिक्षण देण्यांत येत असे. धार्मिक शिक्षणाच्या शाळांना जमिनी तोडून दिल्या असत; व फकट विद्यादान देणे हे मोठे सत्कृत्य आहे असा समज असे.. खेडेगांवांतील शिक्षकांना धान्य वगैरे रूपानें वेतन मिळे. सन १८५४ चे पूर्वीची स्थिती-अर्वाचीन शिक्षणपद्धतीचा मूळ पाया पटला ह्मणजे सन १८५४ सालचा विलायत सरकारचा खलिता होय. गेल्या शतकाच्या अखेरीस सरकाराने लोकशिक्षणाचे काम हाती घेण्यापुर्वी यूरोपखंडांतुन या देशांत येऊन राहिलेल्या मिशनरीनी ते हाती घेतले होते. सरकारतर्फे शिक्षणास मदत देण्याची सुरवात हिंदुस्थान सरकारचे पहिले गव्हरनर जनरल वारन् हेस्तिग्ज यांनी सन १७८१ साली केली. त्यानां फारशी भाषा चांगली अवगत असोन त्याभाषेला उत्तेजन देण्यासाठी कल- कत्ता शहरों त्यांनी एक मदरसा स्थापन केला. फारशी भाषा त्यावेळी दरबारी भाषा होती व न्याय मनसुब्याचे कामही त्याभाषेत चालत असे. तेव्हां