पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३४४ ) तयार होत असलेले नकाशांत गांवें, रस्ते, नद्या, डोंगर, देशाचा उंचसखल पणा, वगैरेबद्दल माहिती फार भरपूर असते. एका मैलास एक इंच याप्र- माणाने हे नकाशे असतात. अजून बरेच भागाची याप्रमाणे पाहणी व्हाव- याची आहे. जंगलाची पाहणी करण्याचे कामही चालू आहे. त्यांत कोणते भागांत किती व कस प्रकारचे जंगल आहे, झाडी किती आहे, त्यांत कोणती झाडे मुख्यत्वेकरून असतात याबद्दल माहिती मिळविण्यांत येते. ५ काडास्त्रल सर्व्ह--जमीन महसुलाचे कामासाठी जमीनीची मोजणी क- रावी लागते हे जमीन बाबीचे भागांत सांगितलेच आहे. ही सर्व हल्ली उत्तर व मध्य हिंदुस्थानांत चालू आहे. बंगाल्यांत काही भागांत मात्र ही सर्व्ह झाली आहे. मध्य भाग, वायव्य प्रांत, व पंजाव यांपैकी पंजाब प्रांतांत गांव कामगा- रांकडून करण्यांत आलेली मोमणी चांगली बरोबर झाली होती, तिचा त्रिपामे- ट्रिकल सव्हेंशी मेळ घालून उपयोग करून घेण्यात आला. वायव्य प्रांतांत ही अशीच व्यवस्था करण्यात आली. मध्यप्रांतांत या सर्वेकडून गांवांचे वाय मर्यादेच्या हद्दी ठरविण्यांत येतात व बाकीची माहिती सेटलमेंट हपीसर हे गांव कामगारांचे माहितीने भरतात. मुंबई इलाख्यांत रोव्हिन्यु सर्व्हकडून डोंगराचा भाग बरोबर मोजण्यांत आला नव्हता. तो मोजण्याचे काम हल्लों चालू आहे. ब्रह्मदशाची सव्र्हे ही चालू आहे. ६ आर्किआलाजिकल सर्व्ह-प्राचीन काळची देवळे, लेणी, स्तंभ, शिलालेख वगैरे या देशांत पुष्कळ आहेत त्यांची ही पाहणी होत असते व हे काम करण्या- साठी जे अंमलदार नेमले आहेत त्यांजकडे प्राचीन कालच्या प्रेक्षणीय इमार- ती व लेणी असलेल्या स्थितीत कायम ठेवणे, ज्या इमारती लेणी वगेरे पूर्व काली बुजून गेलेली असतील ती फिरून उकरून मोकळी करणे, धातूचे पत्र्याव- रील लेखांच्या प्रतो करणे व त्यांचा अर्थ करणे, त्यांचा कालनिर्णय करून त्याव- रून प्राचीन इतिहासाची साधने मिळविणे, ही कामें असतात. ह्या कामास सु- रवात सुरवुइल्यम जोन्स यांचे वेळी झाली व तें काम अजून पर्यंत चालू आहे. या खात्याचे मार्फत झालेल्या शोधांवरून प्राचीन काळच्या पुष्कळ गोष्टी समज- ल्या आहेत वत्या काळचा खरा इतिहास लिहिण्यास साधने झाली आहेत. ७ जिऑग्राफिकल सहें-येथपर्यंत देशांतील भागांचे व वस्तूंचे पाहणी संबं. धानें हकीकत झाली. भूगोलांचे यथार्थ ज्ञान वाढावें या साठी ही हिंदुस्थान सरकार उद्योग करीत आहेत व त्या कामावर अंमलदार नेमलेले आहेत. हे अं- मलदार या देशाचे उत्तरेकडील देशांत प्रवास करून माहिती मिळवितात. तसेच