पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३४३ ) १७१५ मैलाची पाहणी झाली आहे. सर्व किनाऱ्याची पाहणी पुरी होण्यास बराच काळ लागेल. २ भरती ओहोटी व समुद्राची सपाटी यांची पाहणी चालू आहे. याप्रमाणे कि- नाऱ्याचे बरेच भागाची पाहणी झाली आहे. भरतीचे संबंधानें ही पाहणी करून त्यासंबंधाने माहिती त्या कामावर नेमलेले एका अंमल दाराकडून तपासली जाउन ती प्रसिद्ध करण्यांत येते. ३ भूगर्भाची पहाणी करण्यासाठी काही अमलदार नेमलेले आहेत, त्यांनी केलेले शोधांसंबंधी माहिती ही प्रसिद्ध होत असते. ही माहिती मिळविण्या- संबंधाने चांगली व्यवस्था सन १८५६ साली होऊन त्या खात्यावर एक मुख्य अंमलदार नेमण्यात आला ; त्याचे पूर्वी वेगळाले भागांत वेगळाले अंमलदार पाहणी करीत. त्याखात्याचे मार्फत या देशाचे बहुतेक भागांची पाहणी झाली आहे व त्यांत विशेषेकरून दगडी कोळसा, सोने व पेट्रोलियम तेल हे जिनस सापडणारे भागांची विशेष पाहणी झाली आहे. तेनासेरिम प्रांतांत जेथें कथील सांपडतें तो भाग व जेथें मीठ सांपडते असे उत्तरेकडील भाग यांची ही तशीच पाहणी झाली आहे. भगर्भाचे पाहणींत शास्त्रीय भागाकडे जसें लक्ष देण्यांत येते तसेंच देशाचे संपत्तिवर्धक गोष्टींकडे ही लक्ष देण्यांत आले आहे. दक्षिणेकडील भागाचे पाहणीपैकी बरीच कामें अजून व्हावयाची आहेत. सर्व काम पुरे होण्यास पुष्कळ दिवस लागतील. ४ सर्व्ह आफ इंडिया-देशाची मोजणी व पाहणी करण्याचे काम एका स्वतंत्र खात्याकडे सोपविलेले आहे. तें काम या खात्याचे मार्फत फारच चांगले झाले असून त्या कामाचा लौकिकही फार दूरवर गेला आहे. प्रथमतः देशाचे त्रिकोणाकृति भाग करण्यांत आले व त्याप्रमाणे सर्व देशाची मोजणी होऊन सर्व कामाचा बरोबर मेळ बसविण्यात आला. याप्रमाणे त्रिकोण करण्याचे काम त्रिनामेट्रिकल सव्र्हेचे मार्फत झालें. ही सर्व्ह या खात्याचे कामांपैका पहिला भाग आहे. त्रिनामेट्रिकल सव्र्हेने कलेले मोठे महत्वाचे काम याम्योत्तर वृत्ताचे वर्तुलाचे भागाची मोजणी हे होय. यापासून पृथ्वीचा आकार कोणते प्रकारचा आहे हे ठरविण्यास व दुसरे ही पुष्कळ शास्त्रीय शोध करण्यास साधनें मिळतात. ह्या त्रिग्रामेट्रिकल सव्र्हेकडून त्रिकोणाच्या तीन वाजू कायम करून ठेवण्यांत येतात, व या त्रिकोणांत येत असलेले भागाची तपाशलवार पाहणी करणे व त्याचे नकाशे तयार करणे ही कामें टोपोग्राफिकल सट्टेकडून होतात. या खात्याकडून