पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३४१) प्रांतास एक सानिटरी बोर्ड स्थापन करावे व स्वच्छता राखण्याची व्यवस्था कर. ण्यासाठी कायदे करावे व खेडेगांवांत व्यवस्था करण्यासाठी साधे नियम करावे असें फर्माविले आहे. या सानिटरी बोडॉनी शहरांत व बाहेर गांवीं स्वच्छते संबंधाने व्यवस्था कशी ठेवण्याची याबद्दल शहरांतील कमिव्यांस व गांवगन्नाचे लोकांस सल्ला द्यावयाची आहे व ती कामें कशी चालली आहेत या बद्दल देखरे- खही करण्याची आहे. याप्रमाणे सर्व प्रांतांत सानिटरी बोर्डे स्थापन झाली आहेत. मुंबई व मध्यप्रांत यांत स्वच्छतेचे बाबतीत विशेष कायदे आहेत व काही ठिकाणचे लोकल बोडौंचे कायद्यांतच पुरेसे अधिकार दिलेले आहेत. या संबंधाने विशेष तपशीलवार माहिती देण्याचे काही प्रयोजन दिसत नाही. सानिटरी बोर्ड स्थापन होऊन फारच थोडी मुदत झाली आहे व व्यवस्थाही अजून चांगली चालू झाली नाही तेव्हां या व्यवस्थेपासून परिणाम कसा झाला ते सांगता येत नाही. भाग १८ वा. सर्व्ह-पाहाण्या. कोणतेही देशांत सुधारणेची कामें बरोवर चालण्यास त्या देशाचे नैसर्गिक स्थितीची खात्रीलायक माहिती असावी लागते, त्याप्रमाणे या देशाचे संबंधाने वेगळाले प्रकारची माहिती मिळविण्यासाठी हिंदुस्थान सरकारचा सारखा उद्योग चालू आहे. त्या संबंधाची अगदी त्रोटक अशी माहिती मात्र येथे दाखल कर- तो; पूर्ण माहिती पाहिजे असल्यास मार्कहम व ब्लाक साहेबांनी त्या संबंधाने दोन ग्रंथ प्रसिद्ध केले आहेत ते पाहिले पाहिजेत. १ किनाऱ्याची पाहणी-देशाचे किनान्याची माहिती मिळवून नौकानियनासं उपयोगी पडणारे नकाशे तयार करविण्याचे काम पूर्वी हिंदुस्थानचे आरमार खात्याचे मार्फत सन १८६२ पर्यंत होत होते. ते खाते मोडल्यानंतर या कामा- साठी एक अंमलदार नेमण्यांत आला होता, व पुढे सन १८८२ साली किना- याची पाहणी करण्यासाठी नवीन व्यवस्था करण्यात आली. हिंदुस्थानचा किनारा सुमारे ५१०० मैल लांब आहे, त्यापैकी सन १८८८ अखेरपर्यंत