पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३४०) सर्व सालभर बक्षिसे न देतां सापांची अंडी घालण्याचा जो काळ आहे त्याचे पूर्वीचे दोन महिनेच बक्षिसे देण्याची मुदत ठेविली आहे. ही पद्धत सुरू झाल्या- वर पूर्वीचे मानाने मारलेले सर्वांची संख्या सुमारें है अशावर आलेली आहे. पूर्वीचे पद्धतीप्रमाणे लहान मोठे असे सर्व सर्प या सत्रांत येत; आतां नवीन व्यवस्थे- प्रमाणे सर्प मारणान्यांस मोट्या सर्पाचेच पाठीस लागावे लागते. ही पद्धत अम- 'लांत आल्यानंतरचे दोन वर्षांचे अनुभवावरून पाहतां साप चावण्यापासून मृत्यूंची संख्या वाढली नाही; तरी या पद्धतीचेसंबंधानें अनुभव येण्यास आणखी काही मुदत गेली पाहिजे. महामारीचे उपद्रवाचे संबंधानेही वैद्यकी खात्यांतून उपाय करण्यांत येतात, परंतु त्यापासून त्या रोगाचे सांथीचा उपशम होण्यापलीकडे मजल गेली आहे असें नाही. हा रोग उद्भवल्यानंतर रोगी एकीकडे काढणे, घाण नाहींशी करणे, औषधोपचार करणे व रोग्याचे संबंधाचे पदार्थाचा नाश करणे इत्यादि उपायां- नीं रोगाचा प्रसार साधारण कमी होतो असें मटले तरी चालण्यासारखे आहे; परंतु सांथीचा उद्भव बंद करणे किंवा एकदा एखादा इसम त्या दुखण्याचे सपा- व्यांत सांपडल्यावर त्याचेवरील त्या दुखण्याचा अंमल खात्रोनें नाहींसा करणे या गोष्टी अजून साध्य झाल्या नाहीत. देवी काढावण्यापासून मात्र देवीच्या सांथी कमी येतात असे दिसून येते, व त्या संबंधाची भावी स्थिति सामाधान मानण्यासारखी आहे. देवीच्या सांथी पूर्वीपेक्षां आतां कमी येतात, एवढेच नाही तर त्यांचा परिणामही पूर्वीसारखा भयंकर होत नाही. मनुष्य गणतीचे वेळी निघालेले माहितीवरून ही देवी काढविण्यापासून चांगला परिणाम होत आहे व पूर्वीपेक्षां देवाचे यो- गानें पूर्ण अंध, अर्थ अंध, किंवा वण पडलेले लोक कमी होत चालले आहेत असें दिसून येते. देवी काढविण्याचा प्रसार चांगला होत आहे. सन १८. १-८२ सालों इंग्रज सरकारचे राज्यांत ४६११४७५ लोकांस देवी काढविण्यांत आल्या होत्या, व सन १८९१-९२ साली ६:४९००७ लोकांस देवी काडावण्यांत आल्या. आतां रोग विमोचनाचे संबंधाने काय तजविजी चालल्या आहेत त्यांकडे वळू. मोठाले शहरांत मोठाले दवाखाने त्या जिल्ह्याचे वैद्यकी खात्याचे मुख्यांचे हाती असतात. इलाख्याचे शहरी मेडिकल कॉलेजांतील शिक्षक व इतर डाक्टर लोक यांचे हाताखाली दवाखाने असतात. अलीकडे तालुक्यानिहाय सोईप्रमाणे दवाखाने स्थापण्याच्या तजविजी चालू आहेत व त्यांजवर वैद्यकांचे शाळांतून शिक्षण मिळालेले लोक नेमण्यांत येतात. दवाखान्यांत राहून औषध