पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३३९ ). ९.८१ नाही. या देशांत काही कंपन्या, युरोपियन व एतद्देशीयांचे आयुष्याचे विमे एक दराने उतरतात परंतु विमे उतरण्यास मध्यम व वरिष्ठ वर्षांचेच लोक जातात व त्यांतही सुदृढ प्रकृतीचे इसमांचाच विमा उतरतात, तेव्हां ह्या प्रमाणावरून सर्च सामान्य लोकांचे संबंधाने अनुमान काढतां येण्यासारखें नाहों. मरणाचें रजिष्टर बरोबर ठेवलेले नसते हे वर सांगितलेच आहे, दाखल झालेले संख्येपेक्षां मृत्यूची खरी संख्या पुष्कळ जास्त असते. असे अपुरे दाख- ल्यावरून सालोसाल जन्ममृत्युचे प्रमाण कसे पालटत गेले हे समजण्यास या पत्रकांचा उपयोग नाही. तरी प्रत्येक सालांत जे मयत झाले त्यांत कोणते कारणाने किती मयत झाले हे त्यांवरून समजतें. साधारण प्रांताप्रांतांत अंतर पडते, सर्व हिंदुस्थानचे मान कसें बसतें तें येथे देत आहे. रोगाचे नांव. १८८१-८२ १८९१-९२ महामारी. देवी. १.६२ १.६७ ताप. ६९.७० ६४.२० अतिसार, आमांश. ४-११ दुखापत. १.४९ साप व हिंस्र पशूचे डसणे. इतर. १७.३७ १८.३२ साधारण महामारी व देवी या कारणानी होणारे मृत्यूचे संख्येत मात्र वि- शेषसा फरक पडतो. इतर कारणांनी होणारे मृत्यूचे संख्येत सालोसाल विशेषसें अंतर पडत नाही. हिंस्र पशूपासून होणारा त्रास दूर व्हावा ह्मणून त्यांस मार- ण्यास बक्षिसे देऊन उत्तेजन देण्यात येते. एखादे प्रसंगी असे जनावरांपासून विशेष त्रास होतो असें दिसून आल्यास त्या ठिकाणापुरते मोठे बक्षिस लावे- ण्यांत येतें, किंवा फी न घेतों शिकार करण्यास परवानगी देण्यांत येते. सन १८९२ साली अशा प्रकारचे एकंदर ६९ हजार परवाने दिले होते. व त्या साली बक्षिसांत १०६ हजार रुपये खर्च झाले होते. बक्षिसांचे दर वेगळाले प्रांतांत त्यांचे स्थितीचे मानाने वेगळाले आहेत. सर्प दंशापासून मृत्यूंची संख्या मोठी आहे, व त्याचा प्रतिकार करण्याचें ज्यास्त कठीण आहे. जंगली झुडुपें, निवडुंग व केतक्यांची बनें, यांत साधारणतः साप फार राहतात, ह्मणून वस्ती जवळील ठिकाणांतून निवडुंग वगैरे काढून टाकण्याविषयों तजवीज करण्यांत येत असते. बक्षिसे देऊन साप मारण्याचेही चालू आहे. पूर्वीचे बक्षिसे देण्याचे पद्धतीत अलीकडे फरक करण्यात आला आहे तो असा-साप मारण्याबद्दल ०.४०