पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

GENERAL सार्वजनिक बा बनालय ( ३३८) NAZ 'भागसतरावा. जननमरण व आरोग्यरक्षण. जननमरणाचा दाखला ठेवण्याची वहिवाट अजून वाल्यावस्थेतच आहे. शहरांतून ही व्यवस्था वरी चालली आहे, परंतु खेड्यांतून अद्याप तशी स्थिती झाली नाही. हिंदुस्थानांत मृत्यूचे प्रमाण कसे आहे याबद्दल विचार करणे झा- ल्यास ज्या काही ठिकाणी चांगले व्यवस्थितपणे दाखले ठेवण्यांत येतात, तेथील किंवा ज्या वर्गाचे लोकांत दाखले ठेवण्याचे संबंधाने विशेष व्यवस्था असते, अशा ठिकाणचे दाखले घ्यावे लागतात. शहरांतील दाखले सर्व सामान्य स्थिती- चे द्योतक असे मानण्यासही अडचण आहे ; ती अशी की, पुष्कळ लोक बायका- मुलें वाहेर प्रांती ठेऊन शहरांत उदरनिर्वाह करण्यास जातात; या मुळे मृत्यूचें प्रमाण वाढविण्यास मात्र हे लीक कारण होतात, तसे जननाची संख्या वाडे- ग्यास होत नाहीत. एकंदरीत या विषयाचा विचार करण्यास चांगली विश्वसनी- य अशी साधनें नाहींत. सन १८८१ पासून १८९१ पर्यंतची दहा वर्षे साधारण हिंदुस्थानास चांगली गेली असें ह्मणण्यास हरकत नाही; या मुदतीत मोठा दुष्काळही पडलेला नाहीं किंवा मोठ्याशा भागांत पर्जन्याची आप्ती होउन पीकेंही बुडालेली नाहीत; तेव्हां हा काल प्रगतीचा ह्मणून धरला तरी चालण्यासारखे आहे. सन १८९१ चे मनुष्य गणतीचे पत्रकाची तपासणी विलायतेंतील आक्चुअरीकडून (विमा उतरण्यासाठी वयाची किंमत करणारे शास्त्रज्ञाकडून ) कर विली आहे, त्यावरून असे दिसून येते की, युरोपांतील लोकांची साधारण जीवन मर्यादा मध्यम प्रमाणाने पुरुषांस ४१ वर्षे व बायकांस ४४३ वर्षे पडते; व या देशांत पुरुषांस २४३ व बायकांस २५३ अशी पडते; एकंदर जनन झाल्यापासून एक वर्षा- तच मरण पावणारे मुलांची संख्या शेकडा २७ व मुलींची संख्या २४ पडते. विलायतेस हे प्रमाण शेकडा ३४ पासून १७ आहे. विलायतेस जन्माचे प्रमाण- हजारी ३१ पडते; तें इकडे ४० पासून ५० पर्यंत प्रांता प्रांताचे मानाने पडते. तिकडे मृत्यूची संख्या हजारों वीस पेडते. हिंदुस्थानांत ३८ पासून ४५ पर्यंत पडते. हिंदुस्थानांत विवाहाचें माहात्म्य फार माठे आहे व अगदी पूर्व वयांतच पुरुष व स्त्रियांचा समागम घडतो, या गोष्टी लक्षात आणल्या ह्यणजे मृत्यूचें प्रमाण मोठे आहे, हे ठीकच आहे व त्यामुळेच लोकसंख्येची फार वाढ होत