पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुढील कोष्टकावरून या खात्यामार्फत होणारे व्यवहाराचे वाढीची कल्पना होईल. सालें. तार किती तारांची संख्या भांडवल खर्च. मैल होती ती. तारहापिसें. हजार. हजार रुपये. १८५१-५२ ८३ ६ ६२ १८६१-६२ ११४०१ १४४ ७६३२ १८७१-७२ १४८५७ १९९ ६२८ २५५२९ १८८१-८२ २१०४९ २९२ १६१६ २७३६५ १८९१-९२ ३८६२५ १००१ ३८११ ५२२३६ १८९२-९३ ४१०३० ११०० ३९८१ ५२३४६ जमाखर्चाचें मान पाहतां बरेच वर्षांपासून शिलक राहत आहे. तारा पाठ- विण्याबद्दल फी घेण्यांत येते ती जितकी जरूरीने बातमी पाठविण्याची ती पाठ- विणाराची इच्छा असेल त्या मानाने घेण्यांत येते. अतिजरूरीचे तारेस शब्दास चार आणे व साधारण तारेस त्याचे निमे व सावकाश गेली तरी चालणारे तारेचे शब्दास एक आणा अशी घेण्यांत येते. पाश्चिमात्य देशांस तारा पाठविण्याचे संबंधाने सोच झाली आहे व त्यावद्दलची व्यवस्थाही हिंदुस्थानसरकारचे तारखात्याचे मार्फतच होते. सन १८५९ सालीं एका खासगी कंपनीने सुएजपासून मुंबई पर्यंत समुद्रांतून तार घातली, परंतु घाल- ण्याचे काम पुरे होतांच उपयोगी पडेनाशी झाली व ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न पुढे झालेला नाही. सन १८६३ साली तुर्कीसरकाराने कान्स्टांटिनोपलपासून एशिया मैनरांतून बगदादपर्यंत तारायंत्र सुरू केले, तेव्हां हिंदुस्थानसरकारांनी कराचीढून बगदादपंयत इराणचे अखातांतून तार नेऊन दोहोंचा तेथें संयोग केला. या तारेतून बातम्या जाण्यास मधून मधून अडथळा होऊ लागला; तेव्हां दुसरी एक तार इराणांतून बुशायर व तेहरान मार्गाने बगदादपर्यंत घालण्यांत आली. त्यानंतर रूससरकाराने टिफालसपासून इराणचे हद्दीपर्यंत तार घातली व इराणचे शहाने ती तेहरानपर्यंत नेली. या दोन्हीही तारमार्गानें काम बरोवर होत नसे. पुढे सन १८७० साली इस्टर्न टेलिग्राफ कंपनीने सुएझपासून मुंबई- पर्यंत समुद्रांतून तार घातली व इंडो--युरोपिअन कंपनीने विलायतेहून जर्मनी, रशिया व काकैसस् पर्वतांतून तेहरानपर्यंत एक तार आणली. ईस्टर्न टेलिग्राफ कंपनीने चिनांतही तार नेली आहे. तेथून उत्तरएशियांतूनही विलायतेस तार पाठविण्यांत येते. याप्रमाणे विलायतेस तौरा पाठविण्याचे मुख्य तीन मार्ग झाले आहेत. त्यापैकी सुएझचे मार्गाने निमेपेक्षा जास्त बातम्या पाठविण्यांत येतात.