पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३३१) सन १८९४-९५चे जमाखर्चाचे अंदाजांत खर्चासाठी रक्कम रु० ४४८२३००० दाखल करण्यांत आली आहे. रस्ते व इमारतीसंबंधाचे कामांत लष्करी व सिव्हिल असे भाग आहेत. अलीकडे लष्करी कामाचें खाते वेगळे करण्यांत आले आहे; व त्या खात्याकडील कामांवर सन १८९१-९२ साली रुपये १२१४५१८०, सन १८९२-९३ साली रुपये ११९६७९९० खर्च झाला होता, व सन १८९४-९५ चे बजेटांत रुपये १००६८००० दाखल करण्यांत आले आहेत. 119.7978, सार्वजनिक वाचनालय KHED. ZENON भाग सोळावा. टपाल व तारायंत्र. राज्यव्यवस्थेचे खात्यांपैकीं टपालखात्याप्रमाणे एकसारखा सतत वाढत गेलेली व त्याच मानाने लोकप्रिय असलेली दुसरी फार थोडी आहेत. या सा- त्यांत लोकांचे सोईसाठी वारंवार मोठ्या उपयुक्त सुधारणाही पुष्कळशा झाले- ल्या आहेत. गेले दहा वर्षांतच या खात्याकडून वाटले जाणारे पत्रांची संख्या दुप्पट वाढली आहे, हीच गोष्ट या खात्याचे लोकप्रियतेची साक्ष देण्यास पुरै आहे. सन १८९१-९२ साली पते, कार्डा, वर्तमानपत्रे वगैरे सिळून ३३५०७१०८८ पोष्टांतून वाटली गेली; सन १८८१-८२ साली १६४३८५४४९ वाटली होती; सन १८८१-८२ साली दरशंभर लोकसंख्येस पत्र पडत होती, ती सन १८९१-९२ साली १३८ पडली. पत्रव्यवहारासंबंधाने पहिला नंबर मुंबई व सिंध या दोन प्रांतांचा आहे; त्यांत दरशंभर इसमांस २७४ व २६६ अशी पत्रे पडतात. इतर प्रांतांतील प्रमाण यापेक्षा कमी आहे. दरशंभर इसमांस प्रांतवार सन १८९१-९२ साली पत्रे बसली ती येणेप्रमाणे:-मुंबई २७४, सिंध २६६, मद्रास १५८, ब्रह्मदेश १७३, पंजाब १५५, बंगाल १०३, वायव्य- प्रांत ११४, मध्यप्रांत १११, आसाम १११, अयोध्या ७२. मुंबईइलाख्यांतील सं- स्थानांतील पत्रे वजा केली तर बाकीचे भागासंबंधाने ही संख्या दरशंभर