पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३२९) ह्मणून ते पाट नौकानयनासाठी उपयोगात आणतात. पाटबंधाऱ्याचे कामांवर सन १८९२-९३ अखेर भांडवली खर्च रुपये ७४१७२६१० झाला आहे. अयोध्या प्रांतांत असे प्रकारची कामें झालेली नाहीत. या प्रांतांत पाण्याचा नैसर्गिक पुरवठा साधारण पुरेसा असल्यामुळे कृत्रिम उपयांनी पाणी आणण्या- ची जरूर नाही. त्या प्रांतांत लागण जमिनीपैकी एकतृतीयांश जमीन बागाइ- ती आहे. मद्रासइलाख्यांत पाटबंधारे गोदावरी,कृष्णा व कावेरी यांचे दुवेळक्यांचे भागांत आहेत. एकंदर १० मोठी व २० लहान कामें झालेली आहेत. तुंगभद्रा नदीचे- ही कालवे करनूल व कडापा जिल्ह्यांतून जात आहेत व हा मुलूख दुष्काळी असलेमुळे त्यापासून संरक्षण होण्यास त्यांचा उपयोग होतो. मदुरा व गंजम या जिल्ह्यांत मोठाली कामें बांधण्याचे काम चालू आहे. या इलाख्यांतील कालव्यां- पासून भात पिकविण्यास फार उत्तेजन आले आहे. पूर्वीची तळीही पुष्कळ आहेत व त्यांची दुरुस्ती करण्याचेही काम चालू आहे. पश्चिम किनाऱ्याचा भाग शि- वायकरून बाकी इलाख्याचे भागांत पर्जन्याचे मान तुटपुंजीचे असते, या साठी या भागांत वागाइतास तळ्यांचे किंवा नद्यांचे पाणी आणावे लागते, किंवा विहिरी खणाव्या लागतात. या इलाख्यांत कृतिम उपायांनी पाणी आणण्याबद्दल प्रयत्न प्राचीन काळापासून झालेले आहेत. आतां पूर्वीची तळी व बंधारे सर्व सरकारचे झाले आहेत व ते त्यांजवर खर्चही चांगला करीत आहेत. कृष्णा, गोदावरी व कावेरी यांचे दुवेळक्यांतून पाटांचे जणुकाय जाळेंच करण्यात आले आहे; तेव्हां त्या भागांस आतां दुष्काळाची भीति राहिली नाही. या प्रांतांत सन १८९२-९३ अखेर पाटबांधण्याचे कामावर भांडवली खर्च रुपये ७८१५९६७० झाला आहे. मेसुराकडेही तळी, बंधारे वगैरे आहेत व सन १८७६-७७ दुष्काळापासून असे प्रकारची कामें सरकारांतून जास्त अगत्याने होत आहेत. या प्रांतांत मारें जमीन वागाइती आहे. मध्यप्रांतांत सरकारी तळे नेमाडांत एकच आहे, बाकी बागाईत सर्व खाजगी खर्चाने पाणी आणून किंवा विहिरीचे पाण्यापासून होत आहे. रस्ते, इमारती वगैरे. पब्लिक वर्क्स खात्याकडून होणारे कामांपैकी दोन प्रकारचे कामांसंबंधाने येथपर्यंत वर्णन झालें. आता रस्ते व इमारतीचे कामांसंबंधाने सांगण्याचे राहिले आहे ; परंतु यासंबंधाने विशेष सांगण्यासारखें फार थोडें आहे. आगगाड्या