पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३२८) खासगी खर्चाने होते. किनान्याचे भागांत ( कोंकणांत) पावसावर भाताचें उत्पन्न होतें; कृत्रिम उपायांनी पाणी पुरवावे लागत नाही. गुजराथेत विहिरी व महाराष्ट्रांत तळी पुष्कळ आहेत; परंतु त्यांचे पाणी पर्जन्याचे आप्तीचे साली पुरत नाही व याच कारणासाठी सरकारांनी मोठे तलाव बांधून पाणी पुरवि- ण्याचा उद्योग चालू केला आहे. या उद्योगाचा मुख्य हेतु नफा मिळविण्याचा नसून दुष्काळापासून देशाचे संरक्षण व्हावे हा विशेष आहे. या प्रांतांतील पाटबंधान्याचे कामांवर सन १८९२-९३ अखेर भांडवली खर्च रुपये २५३१६- ७३० झाला आहे. वायव्य प्रांतांतील उत्तर व पश्चिम भागांत जमीन एक तन्हेची आहे; तीत कृत्रिम उपायांनी पाणी घेतले ह्मणजे जमिनीवर एक प्रकारचा खारा लोण्याचा पापुद्रा येतो किंवा तीत पाणी साचून पीक होत नाहीसे होते; तरी पूर्वी पर्ज- न्याचे आप्तीचे साली या प्रांतांत नेहमी दुष्काळ पडत तसे गंगेचे व यमुनेचे कालवे झाल्यापासून या भागांत पडण्याचे बंद झाले आहे. पाटाचे पाणी मिळा- ल्याने जास्त मौल्यवान पिके तयार करतां येतात, हा एक विशेष उपयोग आहे. या प्रांतांत गंगेचे व यमुनेचे चार कालवे फार मोठे आहेत व या प्रांतांतील पाटबंधाऱ्याचे कामावर सन १८९२-९३ अखेर रुपये ८२३००८३० खर्च झाला होता. यमुनेचे खालचे कालवे झाल्यापासून नेहमींचे जे पाणी वाहून- जाण्याचे नैसगिक मार्ग ते बंद झाले व त्यामुळे जमिनीत पाणी साचलें जाऊ- न पीक येत नाहीसे झाले आहे. अलीकडे ते पाणी जाण्याचे मार्ग खुले करून देण्याचे कामास सुरवात झाली आहे, व तें काम लवकरच पुरे होईल. या प्रांतां- तलि कालव्यांपैकी मोठाले कालव्यांचा उपयोग नौकानयनासाठीही होतो. सन १८९१-९२ साली ५७५ मैल कालव्याचा भाग जमिनीस पाणी देण्यास पुरून शिवाय या कामी उपयोगांत आला होता. रोहिलखंड, बुंदेलखंड या प्रांतांतलि कालवे व विजनरचे कालवे हे दुष्काळनिवारणासाठीच बांधण्यांत आले वरील प्रांतांप्रमाणे बंगाल्यांत पाटबंधारे उपयोगी असले तरी अत्यवश्य अस नाहीत. या प्रांतांत ४ मोठी व ६ लहान अशी पाटबंधान्याची कामें आहेत. एकंदर ९१६ मैल कालवे सन १८९१-९२ साली चालू होते. त्यांपैकी ७३८ मैल जमिनसि पाणी देण्यास व नौकानयनास उपयोगांत आले होते व १७८ मैल कालवे नौकानयनाचे कामासच उपयोगी पडले. दक्षिण बिहार वगैरे रुक्ष भागांत मात्र कालव्याचा चांगला उपयोग होतो. त्यांचा व ओरिसा प्रांतांत महानदीस बांधून पाटबंधारे काढलेले आहेत त्यांचा हेतु मुख्यत्वें दुष्काळनिवारण हा आहे. या प्रांतांत साधारणतः पाऊस असतो तेव्हां पाटाचे पाणी बहुतेक लागत नाही;