पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३२७) आतां वेगळाले प्रांतांतील कालव्याचे स्थितीचे संबंधाने सन १८९१-९२ सालाबद्दल कांहीं हकीकत सांगतो. पंजाबांतील कालव्यांपैकी, सन १८९१-९२ सालों, ३८६ मैल कालवे नौकानयनास योग्य असे व २७९३ मैल पुराचे पाणी आल्याने चालू रहाणारे व सर्व काळ चालू राहणारे ११०७ मैल असे होते. पुरा- वर अवलंबून राहणारे कालव्यांपेक्षां नेहमी चालू राहणारे कालव्यांस फाटे जास्त असतात. या वर्गाचे कालव्यांत पाश्चिम यमुना, बारीदुआब, सिरहिंद ही कामें मोठाली आहेत व आणखी नवीन कालव्याची कामें चालू आहेत. पुराने पाणी येणारे कालवे लांबीला जास्त असतात ; मुजफरगड कालव्याचे पाणी एक दर ७२६ मैल व सिंधु नदीचे पाटाचे पाणी १५०० मैल असे भागांत पसरतें. सिंधचे लगतचे भागांत पुराचे कालवे फार आहेत व नद्यांचे अंतरवार्तं भागांत नेहमी पाणी असणारे कालवे आहेत. या प्रांतांतील पाटबंधा-याचे कामांवर सन १८९२-९३ अखेर भांडवली त-हेचे ( कर्ज काढलेले) रुपये ७१८२२९८० खर्च झाले आहेत. सिंघत हैदराबाद, कराची, पश्चिम व पूर्व नारा, शिकारपूर वगैरे हे मुख्य कालवे आहेत. या प्रांतांतील पाट-बंधायासंबंधाने मुख्य काम ह्मणजे गाळ काढून साफ ठेवणे, बांध धुपून किंवा फुटून न जातील अशी तजवीज ठेवणे, व जेथून पाणी प्रारंमी कालव्यांत सोडण्यात येते ती कामें चांगली ठेवणे ही आ- हेत. कारण, सिंधु नदीस नेहमीपेक्षा लवकर किंवा उशीरा पूर आले व ह्या तजविजी बरोबर झालेल्या नसल्या तर नुकसान होते. या व पंजाब प्रांतांतील बहुतेक शेतकी पाट-बंधाऱ्याचे व विहिरीचे पाण्यावरून चालते. ह्या प्रांतांतही पुराचे पाण्याचे कालवे व नेहमी पाणी जाणारे कालवे असे दोन वर्गाचे कालवे आहेत. पहिले वर्गाचे कालवे बहुतेक पूर्वीचे राजांचे कारकीर्दीत झालेले किंवा खासगी लोकांनी केलेले असे आहेत. दुसरे वर्गाचे कालवे इंग्रज सरकारांनी केलेले आहेत. या प्रांतांत पाटबंधाऱ्याचे कामाची व्यवस्था जमीनमहसुलाचे व्यवस्थेचे अंगभूत आहे. या प्रांतांतील पाट-बंधाऱ्याचे कामांवर क्यापि- टल खर्च (भांडवली खर्च) सन १८९२-९३अखेर रुपये. १२३७१०८० झाला आहे. बाकीचे मुंबई इलाख्याचे भागांतील पांट-बंधाऱ्याची कामें विशेषशी मोठी नाहीत व त्यांतील महत्वाची आहेत ती महाराष्ट्रांत आहेत. निरा व मुठा काल- व्याचे कामांवर सन १८९१-९२ सालापर्यंत ५१ लक्ष व ६३ लक्ष रुपये खर्च झाले आहेत. बाकीची कामें साधारण आहेत. याशिवाय प्राचीन जे तलाव आहेत त्यांची दुरुस्ती ठेवण्याचेही सरकारांनी अलीकडेस आप- लेकडे घेतले आहे. विहिरींचें व पाटाचे बागाईत बरेच होते, परंतु तें सर्व