पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३२४) पाट बंधारे व तळी याची आणखी एक प्रकारची वर्गवारी आहे; तिचेप्रमाणे असे कामाचे दोन वर्ग आहेत. मेजर ह्मणजे मोठी व मायनर झणजे लहान. हा फरक साधारण ती कामे करण्यास लागलेले शास्त्रीय ज्ञानाचे संबंधाने केलेला असतो, त्यांचे विस्तारासंबंधाने केलेला नसतो. या पहिले (मेजर) वर्गात प्रोडक्टिव्ह व प्रोटेक्टिव्ह या वर्गाची कामें येतात. मायनर (लहान) या वर्गात चालू जमेंतून केलेली कामे येतात. या चालू जमेपैकी केलेले कामां- पैकी काही कामांवद्दल क्यापिटल व रेव्हेन्यु हिशेब वर सांगितल्याप्रमाणे ठेव- तात, तरी त्यांत व्याज आकारण्यांत येत नाही. मेजर वर्गाचे सर्वच कामां- बद्दल तसे हिशेब ठेवतात ; व या वर्गात काही कामांवर चालू जमेंतून खर्च झाला असला तरी त्याचेवर व्याज आकारण्यांत येतेच. ह्या वर्गवाच्या सर्व हिशेवी कामांचे उपयोगाच्या आहेत. पाटबंधा-यापासून कांहीं वसूल प्रत्यक्ष इरिगेशन खात्याकडेस येतो, व कांहीं वसूल जमीनवावेचे स्वरूपाने येतो, व असा वसूल झालेला असला ह्मणजे त्यापेको कांही अंश पाटबंधा-याचे हिशेबी दाखल करण्यांत येतो. आतां पाटबंधाऱ्याचे कामावर आजपर्यंत किती खर्च झाला आहे व उत्पन्न किती होत आहे व चालू खर्च किती लागत आहे याबद्दल माहिती देतो. भांडवल खर्च, (मेजर) मोठी कामें सन अखेर १८७३-७४ १८८२-८३ १८९१-९२ १८९२-९३ रुपये. ८१२९९४१० २०७६६८५६० २८३२०७०३० २८९२३०९७० फामिन इन्शुरअन्स् फंडापैकी पाटबंधाऱ्याचे कामांवर सन १८९२-९३ अखेर रु० १६७६०६३० खर्च झाला. त्या खर्चास सुरुवात सन १८८१-८२ पासून झाली आहे. भांडवल खर्च. (मायनर) लहान कामें सन अखेर १८८२-८३ १८९१-९२ १८९२-९३ रुपये. ३०४०३३२० ४६३६६५१० ४७३६१०३०