पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३२३) कालवा गंगा नदीला काढला; तें काम बांधण्यास सन १८४८ साली सुरवात होऊन लांत पाणी सोडण्याचे लार्ड डलहौसी यांणी सन १८५४ साली सुरू केले. त्याच सुमारास दक्षिणेतही गोदावरी, कृष्णा व कावेरी या नद्यांचे पाट- बंधारे बांधण्यात आले. या सरकारी प्रयत्नांस चांगले यश आलेले पाहून मद्रासेकडे व कलकत्याकडे दोन तीन कंपन्यांनी पाटबंधारे बांधण्याचे काम करण्याचा उद्योग केला, परंतु त्यांचे हातून ते कामं सिद्धीस गेले नाही ; व त्यांस ती कामें सरकारचे स्वाधीन करावी लागली. वायव्य प्रांतांतील महत्वाचे पाट- बंधारे यमुना व भागीरथी नद्यांचे आहेत. शरदऋतूंत व वसंतऋतूंत बर्फ वितळू न या नद्यांस पूर येण्याचे पूर्वी, शेतकीस पाण्याची फार जरूर असते असे वेळी या कृत्रिम पाटांचे पाण्याचा फार उपयोग होतो. पाणी आणण्या- साठी हरिद्वार येथे गंगेचा बहुतेक प्रवाह पाटांत घेण्यांत आला व तो पुढे नेण्यासाठी अचाट श्रम व पैसा खर्च केला आहे. या पाटाचें हरिद्वारापासून पहिले वीस मैलांतील काम पाहण्यासही फार फार मनोहर आहे. काही ठिकाणी हा कालवा नद्यांचे पोटांतून नेला आहे, व त्याचेवरून सर्व नदीचा प्रवाह जातो. कोठे मैल दोन मैलपर्यंत पूल बांधून त्यावरून ते पाणी नेले आहे. त्या पाटाचे उगमापासून २०० मैलांवर भागीरथी नदीस फिरून एक पाट काढण्यात आला आहे. दोन्ही पाटांचे मिळून दरसेकंडास १०००० घनफूट पाणी लोकांस देण्याचे सामर्थ्य आहे. भागीरथीचे कालव्याचे प्रमाणाने लहान परंतु एकंदरीत चांगले मोठे असे तीन कालवे यमुना नदीचे काढले आहेत. इतर प्रांतांतही मोठी कामें आहेत, परंतु या कालव्याचेबद्दल तपशील येथे देण्याचे कारण सरकारांनी या कामी कसे दीर्घ प्रयत्न केले आहेत हे दाखवावें हैं आहे. कालव्यासंबंधानें प्रांतवार वर्णन पुढे क्रमाने येईल. पाट-बंधाऱ्यांचे दोन मुख्य वर्ग आहेत. (१) प्रोडक्टिव्ह (ह्मणजे उत्पन्न येणारे) व (२) प्रोडक्टिव्ह शिवायकरून दुसरे. तिसरा एक वर्ग आहे त्याचे नांव प्रोटेक्टिव्ह (संरक्षणासाठी केलेले ); या वर्गाचे पाट-बंधारे दुष्काळ निवारणार्थ फंडांतून केलेले असतात. प्रोडक्टिव्ह वर्गाचे पाटबंधारे कर्ज काढून केले तरी चालतात व त्यांचेसाठी कर्ज काढून ते केलेले असोत किंवा चालू खर्चातून ते केलेले असोत, या कामांवर खर्च झालेले पैसे भांडवल असें समजून त्यांवर हिशेबी व्याज आकारण्यांत येते. दुसरे वर्गाची कामें चालू जमेंतू- नच केली पाहिजेत. त्यांचेवर खर्च झालेले भांडवलावर व्याज आकारण्यांत येत नाही. पहिले वर्गाचे व दुसरे वर्गापैकी काही कामांचें क्यापिटल (ह्मणजे भांडवलाचे) व रेव्हिन्यू ह्मणजे जमेचे असे हिशेब ठेवण्यात येतात.