पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३२२ ) जमाखर्च मार्चअखेर सालाचे असतात, त्याप्रमाणे पान १२९ वरील जमाखर्चाचे कोष्टकांत आंकडे दिले आहेत. त्याचा वेगळाले प्रकारचे आगगाड्यांचे संबंधानें तपशील देतों तो असा:- जमा हजार रुपये इतर स्टेट( सरकारी) आगगाड्या. १६४११९ ८२१४५ ८०८७९ ग्यारंटीड आगगाड्या. ३४९३१ ३८२६३ मदत दिलेल्या आगगाड्या. ३३० ३३१ किरकोळ खर्च. ९२१ चालू खर्च १९९३८० २०२५३९ सन १८९१-९२चे पूर्वीचे दहा वर्षांचे मानाने आगगाड्यांची वृद्धी कशी झाली आहे हे पाहतां, असे दिसते की, रस्ता १८८०-८१ साली शंभर मैल होता असें धरले तर सन १८९१-९२ साली १८६ झाला; त्याच प्रमाणाने उतारू २४२, माल १९८, निवळ उत्पन्न १७७ असे झाले होते. सन १८९१-९२ साली आगगाड्यांकडे २६०६०० नौकर लोक होते त्यांत २५००३६ नेटिव, ४६०६ युरोपियन व ५९३६ युरेशियन असे होते. या साली अपघात झाले त्यांत ६४५ इसम मयत झाले, १०८४ दुखावले गेले. एकंदर अपघात ४२९८ झाले त्यांपैकी रेल्वेआक्टाप्रमाणे सरकारास कळविण्यास लायख असे १६६ होते. सन १८९१-९२ साली आगगाड्यांतील व्हालंटीअर पलटणीत युरोपियन व युरेशियन ९५२५ होते; पैकी ८९०३ चांगले तयार होते. पाटबंधारे व कालवे. या देशास पाटबंधाऱ्यांचे महत्व किती आहे याचे वर्णन शेतकीचे भागांत केले आहे. शेतकीवरच जनसमाजाचा चरितार्थ चालण्याचा असलेमुळे व पर्ज- न्यवृष्टीचे मान अनिश्चित असलेमुळे कृत्रिम उपायांनी उदकसंचय करण्याची किंवा उदकप्रवाह आणण्याची रीत पूर्वीचे राजांचे कारकीर्दीपासून आहे. सिंध देश निर्जल असूनही प्राचीन काळी कृत्रिम उदकप्रवाहांनी तो फार सुपीक झाला होता; तसेच कावेरी नदीचे पाट १६०० वर्षांपूर्वीच बांधण्यात आले होते; तेच आतांही सुधारणा होऊन चालू आहेत. यमुनेचे पूर्व व पश्चिमेकडील का- लवे हे फेरोजशहा तघलख व शहाजहान यांचे कारकीर्दीत झाले आहेत. इंग्रज सरकारांनी पाट-बंधा-यांची मोठाली कामें केली आहेत. त्यांनी पहिला मोठा .