पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३२१ ) ह्या कोष्टकांतील रकमांचा कांही तपशील देणे इष्ट दिसते. आगगाड्यांचे प्रकार वर सांगितले आहेत, त्या प्रत्येक प्रकारचे आगगाड्यांचा रस्ता, त्यांची जमा व खर्च किती होतों यावद्दल माहिती देतो. ही माहिती सन १८९१ सालाबद्दल आहे. हे साल घेण्याचे कारण तें दशवार्षिक रिपोर्टाचें साल आहे. आगगाड्यांचा रस्ता किती चालू होता त्याचा तपशील येणेप्रमाणे :-ग्यारं- टोड ( हमी दिलेल्या ) कंपन्यांच्या आगगाड्यांचा रस्ता मैल २५८७ ; असिस्टेड (मदत दिलेले ) कंपन्यांचा रस्ता मैल ८४१ ; सरकारी (स्टेट) आगगाड्यांचा रस्ता मैल ११५२० ; संस्थानिकांच्या आगगाड्या मैल १४३३ ; एकूण मैल १७२८३. (हे आंकडे स्टाटिस्टिकल आबस्त्राक्टावरून घेतले आहेत व त्यांत हमी दिलेले कंपन्यांचे बेरजेंत व तपशिलांत अंतर आहे.) सन १८९१. उत्पन्न हजार रु. ग्यारंटीड कंपन्या. ७६२०३ ३७७२३ आसिस्टेड कंपन्या. २६२३ १४६८ स्टेटआगगाड्या. १५३८२७ ६९२६३ संस्थानिकांच्या आगगाड्या. ६४१९ ३७३२ चालू खर्च. बेरीज हजार रुपये २३९०७२ ११२१८६ सन १८९१ अखेर भांडवल कोणते प्रकारचे आगगाड्यांवर किती खर्च झाले होते त्याचा तपशील येणेप्रमाणे :- रुपये. १ सरकारांनी आगगाड्या बांधल्या किंवा विकत घेतल्या त्यांचेवर.... .१३३५४६०७४० २ सरकारी आगगाड्या कंपन्यांकडून करविलेल्या २८११३७६३० ३ ग्यारंटीड़ ( हमीच्या) कंपन्यांनी खर्च केलेला ४९२०५८६८० ४ मदत दिलेल्या कंपन्यांनी खर्च केले ते ५६०७०३६० ५ संस्थानिकांनी खर्च केलेले ८६००२५१० ६ परराष्ट्रांच्या आगगाड्या... १६८९०६८० ७ रेल्वेची सर्व्हे वगैरे करण्यांत खर्च ९०७७०५० ... २२७६६९७६५० आगगाड्यांसंबंधानें हिशेब दिजंबरअखेर साल धरून ठेवलेले असतात; त्यांचेप्रमाणे वरील माहिती सन १८९१ दिजंवरअखर दिली आहे. सरकारी २१