पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३१८) आगगाड्या. या देशांत आगगाड्या करण्यास सुरवात लार्ड डलहौसी यांचे कारकीर्दी । झाली. आगगाडौंतून पाहेल्याने उतारून नेऊं लागण्यास सुरवात मुंबई व ठाण्याचे दरम्यान सन १८५३ सालों झाली. त्याचे पुढचे साली ईस्ट इंडिया रेलवेने कलकत्त्यापासून ३८ मैल रस्ता सुरू केला. मद्रासरेल्वेने सन १८५६ साली पहि- ल्याने ६५ मैल रस्ता खुला केला. साउथ इंडिअन रेलवेची सन १८६१ साली सुरवात झाली. सन १८५३ सालों आगगाडी २० मैल होती. सन १८६१ साली १५८८ मैल, सन १८७१ अखेर ५०७७६ मैल, सन १८८१ अखेर ९८९२ मैल, व सन १८९१ अखेर १७२८३ मैल, सन १८९३ अखेर १८४५९ मैल खली होती. यावरून आगगाड्यांचा विस्तार कसा झाला ते दिसून येईल. आगगाड्या तीन रीतीने करण्यांत येतात. (१) कंपन्यांकडून त्यांस व्याजाबद्दल हमी देउन. (२) कंपन्यांस कांहीं थोडी मदत देऊन. (३) सरकारमार्फत. आगगाड्या बांधण्यास पहिल्याने सुरवात झाली ती ज्या कंपन्यांचे भागी- दारांस सरकारांनी व्याज देण्याची हमी दिली होती असे कंपन्यांकडून झाली. व्याचे पूर्वी हमीशिवाय खासगी कंपन्यांनी आगगाड्या बांधाव्या असेवेद्दल सन १८४३ पासून खटपट सुरू होती; परंतु त्यापासून काही निष्पन्न झाले नाही; तेव्हां, कंपन्यांस व्याजाची हमी देण्याची पद्धति सन १८४९ साली सुरू झाली. त्याप्रमाणे मुंबई, मद्रास व कलकत्ता ह्या तीन राजधान्या जोडणाऱ्या आगगा- ज्यांचे रस्यांची सुरवात अशा कंपन्यांचे हातून झाली व त्या पुन्या होऊन आगगाडीद्वारे त्या शहरांचा परस्पर प्रत्यक्ष संबंध सन १८७१ साली जुळला. आतां या हमाचे कराराचे शतीसंबंधाने चार शब्द सांगणे जरूर आहे. सरकारांनी पहिल्याने व्याजाबद्दल हमी दिली ती ९९ वर्षांचे मुदतीची दिली ; तीप्रमाणे भागावर काढलेले कर्जावर शेकडा पांच टक्के व्याज देण्याचे व डिबें- चरवर काढलेले कर्जावर कमी दराने व्याज देण्याचे कबल केलें शिवाय जमीन फुकट दिली होती. अशा कंपन्या सरकारचे देखरेखी- खाली कामें करतात व निवळ उत्पन्नांतून व्याज भागले नाही तर तूट सरकार भरून देतात व बचत राहिली तर ती सरकार व कंपनी निमेनिम वांटून घेतात. या कंपन्यांनी आगगाड्यांतून टपाल फुकट नेण्याचे व सैन्य व सरकारी स्टोराचें सामान कमी दराने नेण्याचे असते. रेल्वेसंबंधाने सर्व व्यवहार रुपयास १ होते;