पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हा माल कोणते प्रकारचा किती आला याबद्दल माहिती:- आंकडे हजार रुपयांचे आहेत. १८७५--७६ १८९१-९२ १८९३-९४ १२८८ ५०२० १७६३ १५९ ५८० २०२ २१९ २२२ १४६ १ ४८२ ८८९ १२९६ ४८७३ ५७२० ८७७ ६८७ ४७९३ १०२१२ १०९१५ २८५ २४९५ ११२८ १३६३ १७३१ ३८११ ७५२५ हत्यारे. कोळसा. औषधे. कातड्याचें सामान. दारू. यंत्रे. धातू व धातूचा माल. कागद व स्टेशनरी. आगगाडीचे सामान. तारायंत्राचे सामान. लोकरीचे सामान. इतर. ३१०० ७४३ व्यापाराची बाकीः-व्यापारासंबंधाने या देशाविषयी एक गोष्ट विशेष आहे ती ही की, परदेशांत तयार झालेला माल हिंदुस्थानांत खपतो, त्या मा- लाच्या किमतीपेक्षा पुष्कळ जास्त किमतीचा माल या देशांत उत्पन्न होऊन परदेशांत खपतो. या देशांत माल तयार करण्याचे कारखाने फार थोडे आहेत व ते युरोपियन लोकांनी तरी काडलेले आहेत किंवा त्यांचे उदाहरण घेऊन येथील लोकांनी काडिले आहेत; याकरिता पुरेसा पक्का माल येथे तयार होत नसून, अशा प्रकारचा बराच माल देशांत पुरवठा होण्याकरितां परदेशांपासून विकत घ्यावा लागतो. या देशाची स्थिति अशी आहे की येथे पाहिजे तितका कच्चा माल उत्पन्न होऊ शकतो व उष्ण व समशीतोष्ण कटिबंधांतील सर्व प्रकारचे जिन्नस या देशांत होतात. शेतकीचा मालही विपुल होतो व त्याचा खपही युरोपांतील देशांत व इतर देशांत फार होतो, यामुळे तो परदेशांस फार रवाना होतो. हिंदुस्थान देशांतील लोकांची गृहस्थिति व त्यांचा राहण्याचा रिवाज ही फार साधी आहेत; त्यांस प्रपंचास फारशा जिनसा लागत नाहीत, यामुळे प- रदेशांहून येणारा माल परदेशांस जाणारे मालापेक्षां फार कमी असतो. जितका माल परदेशांस जातो तितके किमतीचा माल परत न आल्याने हिंदुस्थानची